Sanjay Raut : ‘आमदारांना गुंगीच औषध देऊन बधीर करण्याचा प्रयत्न’, संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

Sanjay Raut : "जेव्हा मुस्लिम समाजाने मोदींना मतदान केलं, त्यांच्याकडून काही अपेक्षा असतील, तेव्हा वोट जिहाद नाही. भ्रमनिरास झाल्यावर तुमच्या विरोधात मतदान केलं, तेव्हा तो वोट जिहाद. तुम्ही कोणतं नरेटिव्ह सेट करताय"

Sanjay Raut : 'आमदारांना गुंगीच औषध देऊन बधीर करण्याचा प्रयत्न', संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप
Follow us
| Updated on: Oct 05, 2024 | 11:01 AM

“वोट जिहादवर आरएसएस, भाजपा फेक नरेटिकव्ह सेट करतय. वोट जिहाद काय असतं? त्यावर श्वेतपत्रिका काढावी लागेल. भाजपा निवडणूक हरले की वोट जिहाद, एखाद्या मतदारसंघात मुस्लिमांनी मतदान केलं की, वोट जिहाद नाही का?” असं सवाल संजय राऊत यांनी वोट जिहादवर विचारला. “या देशात सगळ्या जाती धर्माचे मतदार आहेत. त्यांना मतदानाचा अधिकार आहे. त्यांचा मतदानाचा अधिकार काढलाय का? कोणाला मतदान करायचा हा त्यांचा अधिकार. 2014 आणि त्याआधी उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात मुस्लिम समाजाने मोदींना मोठ मतदान केलं होतं. तुम्ही आकडे पाहा, त्याला काय म्हणालं” असं संजय राऊत म्हणाले.

“जेव्हा मुस्लिम समाजाने मोदींना मतदान केलं, त्यांच्याकडून काही अपेक्षा असतील, तेव्हा वोट जिहाद नाही. भ्रमनिरास झाल्यावर तुमच्या विरोधात मतदान केलं, तेव्हा तो वोट जिहाद. तुम्ही कोणतं नरेटिव्ह सेट करताय” असं संजय राऊत म्हणाले. ठाकरे गटाचे आमदार नितिन देशमुख यांनी सूरतमध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप केला. त्यावर सुद्धा संजय राऊत बोलले आहेत.

‘आमदारांना गुंगीच औषध देऊन बधीर करण्याचा प्रयत्न’

“हो, जवळजवळ तसाच प्रयत्न झाला. अनेक आमदार आहेत, ज्यांना गुंगीच औषध देण्यात आलं. बधीर करण्यात आलं. नितिन देशमुख तिथून पळून आले. आमचे अजून आमदार आहेते जे तिथे गेल्यावर गुंगीमध्ये होते. त्या हॉटेलच्या किचनचा ताबा या लोकांकडे होता. आमदार खासगीमध्ये सांगतात, खाण्यातून, पेयातून काहीतरी दिलं जात होतं. सात-आठ दिवस काय चाललय ते कळत नव्हतं. काही आमदारांची मानसिक स्थिती बरोबर नव्हती. पण आता हे सिद्ध करणारे पुरावे नाहीत” असं संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.