Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांनी सांगावं ते नराधमाच्या बाजूने आहेत की विरोधात? – उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : "पैसे देऊन गर्दी करायची. रेकून रेकून भाषणं करायची. त्यांच्यासोबत गुलाबी जॅकेट होतं. हा काय फॅशन शो सुरू आहे का? राख्या बांधून घ्यायच्या. हे असंवेदनशील सरकार आहे. हे राजकारण आहे असं सांगत असतील तर असं बोलणारेही हे विकृत आहेत"
“फ्लेक्स असतील. म्हणून निषेध नोंदवू नये का? यात राजकारण काय? निषेधही करायचा नाही का? हे सरकार असंवेदनशीलपणे वागतं. अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली. तेव्हाही हे सरकार उद्धटपणे वागलं. तेव्हा तर फडणवीस हे गाडीखाली कुत्रा आला तरी राजीनामा मागतील असं म्हणाले होते. यांना जनतेच्या जीवाची किंमत नाही? एखाद्याची हत्या झाली तर त्याची तुलना तुम्ही गाडीखाली आलेल्या कुत्र्याशी करता, मग या चिमुरडीची तुलना कुणाबरोबर करत आहात? यांना मुलंबाळं नाही का. हे सुरक्षित आहेत का? असुरक्षित आहेत का? यांना नेमकं काय म्हणायचं आहे?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
“मी सांगतो, ते अर्धवट राहिलं. ही बातमी वाचण्याचं धाडस माझ्यात नाही. मग ती कलकत्यातील असेल किंवा राजस्थानातील. ही विकृती आली कुठून? या घटनेतील मुलीची आई गर्भवती आहे. तिला 10 तास खोळंबून ठेवलं. तिला ताप होता. हे सरकार कुणाचं आहे. नराधमाचं सरकार आहे का? राजकारण करायचं असेल तर राजकारण करू. आता तरी यात राजकारण करत नाही. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगावं ते नराधमाच्या बाजूने आहेत की विरोधात?” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘हा काय फॅशन शो सुरू आहे का?’
“ही योजना लाडकी बहीण योजनेसारखी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली नाही. हे त्यांना पहिलं कळलं पाहिजे. काल ते तिकडे पोहोचायला पाहिजे होते. पण रत्नागिरीत डामडौलाने बसले होते. पैसे देऊन गर्दी करायची. रेकून रेकून भाषणं करायची. त्यांच्यासोबत गुलाबी जॅकेट होतं. हा काय फॅशन शो सुरू आहे का? राख्या बांधून घ्यायच्या. हे असंवेदनशील सरकार आहे. हे राजकारण आहे असं सांगत असतील तर असं बोलणारेही हे विकृत आहेत” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. “पोलीस आयुक्त कोण आहेत? डुमरेंचं डमरू का वाजलं नाही? पोलीस आयुक्त होते कुठे? पोलीस असं वागत नाहीत. पण त्यांच्यावर दबाव असेल तर ते नराधमा एवढेच गुन्हेगार आहेत. त्यांना शिक्षा झाली पाहिजे” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलय.