उद्धव ठाकरेंची कणकवलीत शपथ, ‘महाराष्ट्रातून नेलेलं सर्व परत आणणार’
"इतकी चांगली किनारपट्टी आहे. इतकं वैभव आहे. ऐतिहासिक गडकिल्ले आहेत. का नाही यासाठी काही आणत? मेडिकल कॉलेज मी मंजूर करून दिलं. कोणाचं आहे ते बघितलं नाही. अमित जी मला हिंमत विचारता. या इथं समोरासमोर बसुयात", असं चॅलेंज उद्धव ठाकरेंनी दिलं.
ठाकरे गटाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज कणकवलीत सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजवर सडकून टीका केली. तसेच इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर महाराष्ट्रातून नेलेलं सर्व परत आणणार, अशी शपथ उद्धव ठाकरेंनी यावेळी घेतली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला. “संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय. कोकण माझं हक्काचं आहे. तुम्ही आपली आहात. आपलं नातं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यासारखं नाही. बहोत पुराना रिश्ता है”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टोला लगावला. “7 तारखेला इथे खासदार विनायक राऊत यांना मतदान करू. इथलं आवरून तुम्ही सर्व मुंबईत या”, असं उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं.
“कोकणात येणार म्हटल्यावर कोणी तरी धमकी दिली. मराठीत एक म्हण आहे ‘शुभ बोल रे नाऱ्या’. ये पाहतो अशा धमक्या, तू येच तुला आडवा करतो. आज बेअक्कली जनता पार्टीचे नेते येऊन बोलून गेले. अनेक बेचा पाढा येतो मला. तिथं आले आणि मला आव्हान देऊन गेले”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“अमित शाह यांनी हिंमत असेल जनतेच्या प्रश्नावर बोलावं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच “तुमच्या पेक्षा कोंबड्या बरं”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. “राम मंदिर बांधलं. चांगलंच केलं. मात्र जेव्हा कोण नव्हतं तेव्हा शिवसेना होती. बाळासाहेब काय? हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बोला”, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.
‘कमळाला मळाचा प्रचार करावा लागतोय’
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना तुम्ही बदलायला निघालात. त्यात बाबासाहेबांनी आंदोलन केलं होतं. अमित शाह तुमच्यासारखे गोमूत्रधारी त्यांना अडवत होते. सावरकरांवर आम्हाला बोलायला लावता. मोदी जी तुम्ही शामा मुखर्जींवर बोला. निष्ठावंत भाजप कार्यकर्त्याचा मला आदरच आहे. मात्र कमळाला मळाचा प्रचार करावा लागतोय”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली.
“तुमचा गजनी जाहीरनामा काढा. मोदी देशाचा वाचनामा विसरून गेले. तुम्हाला मुलं होत नाही म्हणून आमची मुलं घ्यावं लागतंय. राणेंना मत म्हणजे मोदींना मत म्हणता. गुंडगिरीला मत म्हणजे मोदीला मत असं म्हणायचं आहे का? उमेदवाराला सांगतो उगाच काय तरी वाटेल ते बडबडू नको”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘महाराष्ट्रातून नेलेलं सर्व आणणार ही शपथ’
“मी अभिमामाने घराण्याचा वारसदारच आहे. अमित जी माझ्या वडिलांचं नाव घेऊन मत मागू नका. माझे लोक माझ्या वडिलांचं नाव चोरतात . संपूर्ण देश तुम्ही नासवून दाखवा. दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत. महाराष्ट्राच्या आड याल तरं याद राखा. इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर हे नेलेलं सर्व आणणार ही शपथ आहे माझी”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“अमित जी आले काही दिलचं नाही. टेसला ह्यांची जाण्याची वाट बघत आहे. महारष्ट्रात राख आणि गुजरातला रांगोळी. हिंमत असेल तर बारसुला रिफायनरी होणार असं जाहीर करा. अमित जी मी तर होऊच देणार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. लस मोदींनी शोधली म्हणून मोदींचा फोटो. मग शेणखतावर बैलाचा फोटो टाका. मी इथं आलेलो, विमानतळाच्या उद्घाटनासाठी आलो होतो. ते विमानतळ चालू आहे की बंद?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
“इतकी चांगली किनारपट्टी आहे. इतकं वैभव आहे. ऐतिहासिक गडकिल्ले आहेत. का नाही यासाठी काही आणत? मेडिकल कॉलेज मी मंजूर करून दिलं. कोणाचं आहे ते बघितलं नाही. अमित जी मला हिंमत विचारता. या इथं समोरासमोर बसुयात. महाराष्ट्रात शूर आम्ही वंदिले असं होतं. आता चोर आम्हा वंदिले असं भाजपचं चाललंय”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.