राज ठाकरे यांचं पत्रं ते भाजप, शिंदे गटाच्या कुरापती… उद्धव ठाकरे यांची सडकून टीका; म्हणाले, अर्ज मागे घेण्यासाठी…

दसरा मेळाव्यानंतर मी जाहीर सभा घेणार आहे हे मी आधीच स्पष्ट केलं आहे. मी पोहरादेवीच्या दर्शनाला येणार आहे. कधी मेळावा घ्यायचं ते ठरवा.

राज ठाकरे यांचं पत्रं ते भाजप, शिंदे गटाच्या कुरापती... उद्धव ठाकरे यांची सडकून टीका; म्हणाले, अर्ज मागे घेण्यासाठी...
राज ठाकरे यांचं पत्रं ते भाजप, शिंदे गटाच्या कुरापती... उद्धव ठाकरे यांची सडकून टीकाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 5:56 PM

मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचं (shivsena) नाव आणि चिन्हं गोठलं गेलं. त्यानंतरही शिंदे गटाने ही निवडणूक लढवली नाही. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना पत्र लिहून भाजपने ही निवडणूक लढवू नये अशी विनंती केली. त्यानुसार भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप, शिंदे गट आणि राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मातोश्रीवर झालेल्या काही कार्यकर्त्यांच्या प्रवेश समारंभावेळी उद्धव ठाकरे यांनी ही टीका केली आहे.

आपल्याला मैदान मिळू नये म्हणून प्रयत्न झाला. त्यानंतर पोटनिवडणूक लागली. अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध न करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ती निवडणूक तोंडावर आहे म्हणून काही लोक घाईघाईने निवडणूक आयोगाकडे गेले. त्यांनी आपलं चिन्हं आणि पक्षाचं नाव गोठवलं. ठिक आहे. नाव गोठवलं. मी माझं नाव घेऊन आणि माझी मशाल घेऊन पुढे जाईल. संपूर्ण राज्य माझ्या मागे उभं राहिलेलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

आपल्या मागे जनतेची ताकद असल्याचं दिसल्यानंतर काही लोक स्वत: लढले नाही. आपलं चिन्हं आणि नाव गोठवल्यानंतरही ते लढले नाहीत. त्यांनी भाजपला पुढे केलं. त्यांनीही मोठा आव आणून अर्ज भरला. अर्ज भरल्यानंतर. आम्हाला कोणी विनंती करतं का? अर्ज मागे घ्यायला सांगतं का?… तुम्ही या… तुम्ही या… आम्हाला विनंती करा… असं सुरू झालं. नंतर त्यांनी कुणाला तरी उभं केलं. त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती करून घेतली. विनंती करा म्हणून विनंती करत फिरत होते, असा टोला त्यांनी भाजप आणि राज ठाकरे यांना लगावला.

महाराष्ट्रातल्या संस्कारी माणसाला जे काही चाललंय ते पटलेलं नाही. पटत नाही. आश्चर्य म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांच्याशी जवळीक होईल असं वाटलं नव्हतं. ज्यांच्यांशी संबंध येईल असं वाटलं नव्हतं असे लोक जवळ येत आहेत. वेगवेगळ्या धर्माचे लोकं माझ्यासोबत येत आहेत. आजही काही लोक आले आहेत. सर्वांचं म्हणणं आहे की, तुम्ही लढा आम्ही तुमच्यासोबत आहोत. जे काही होत आहे ते आम्हाला मंजूर नाही, असं त्यांनी सांगितलं.

सध्या राजकारणाची पातळी खाली गेली आहे. मला शिवसेनेची चिंता नाही. शिवसेनेचं काय होईल ते पाहायला मी समर्थ आहे. मला चिंता आहे ती देशातील लोकशाहीची. देशाचं काय होणार? देशाची लोकशाही जिवंत राहणार का? की परत 150 वर्षाच्या गुलामगिरीची राजवट आपल्याच कर्माने आपण परत आणणार आहोत? हे आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

दसरा मेळाव्यानंतर मी जाहीर सभा घेणार आहे हे मी आधीच स्पष्ट केलं आहे. मी पोहरादेवीच्या दर्शनाला येणार आहे. कधी मेळावा घ्यायचं ते ठरवा. ठाणअयात सभा घ्या मी आलोच. ठाणे चिडीचूप झालेलं नाही तर चिडून पेटून उठलं आहे. शिवसेनेवर आघात झाला तेव्हा शिवसेना दसपटीने नव्हे शतपटीने मोठी झाली, असंही त्यांनी सांगितलं.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.