एसटीच्या फुटलेल्या काचांवर गतिमान महाराष्ट्राची जाहिरात, उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला

uddhav thackeray in konkan : शिवसेनाच्या वर्धापन दिनानंतर दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे कोकणात आले. यावेळी संजय कदम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे अन् भाजपवर जोरदार टीका केली.

एसटीच्या फुटलेल्या काचांवर गतिमान महाराष्ट्राची जाहिरात, उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला
uddhav thackeray in konkan
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 10:43 AM

खेड, रत्नागिरी : राज्यात एसटीमध्ये सुविधा नाही. एसटी महामंडळाची परिस्थिती बिकट झाली आहे. एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती कठीण आहे. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाही. एसटीच्या काचा फुटलेल्या आहेत. अन् त्या एसटीवर हसरा फोटो लावून जाहिरात करत गतिमान महाराष्ट्र, असा हल्ला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांवर केला. खेडमध्ये माजी आमदार संजय कदम यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते.

जागतिक पातळीवर मुख्यमंत्र्यांचे कौतूक पण मोदींचे नाही

जागतिक पातळीवर देशाच्या पंतप्रधानांचे कौतूक झाले नाही, परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे कौतूक झाले. कारण आपण मुख्यमंत्री असताना तशी कामे केली होती. महाराष्ट्रात सर्व काही चांगले सुरु होते. उद्योग येत होते, गुंतवणूक सुरु होती. शेतकरी अन् जनहिताचे निर्णय होत होते पण माशी शिंकली अन् गद्दारांनी शिवसेना फोडली, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

गद्दारांनी हे लक्षात ठेवा

माझे हात रिकामे आहेत. आता माझ्याकडे काहीच नाही. तरी तुम्ही माझ्यासोबत आला आहात, ही पूर्वजांची पुण्याई आहे. आता मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. अन् जे गद्दार आहेत, त्यांनी लक्षात ठेवावे की तुम्ही शिवसेना नाव चोरु शकता, पण शिवसेना नाही. गद्दारांनी शिवसेना नाव बाजूला ठेवा, अन् समोर यावे. मग कळेल कोण खरे आहे. निवडणूक आयोगाच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसले तर त्यांनी शिवसेना पाहण्यास यावे. येथील गर्दी पाहवी. आता संजय कदम शिवसेनेत आले, अनेक जण आले आहे.

हे सुद्धा वाचा

ज्यांनी बाळासाहेबांना पहिले नाही, ते विचार शिकवणार

मुंबईनंतर पहिला भगवा कोकणात फडकला होता. त्यावेळी जिवाला जीव देणारे सहकारी होते अन् आजही आहे. ज्या लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांना पाहिले असे अनेक जण तिकडे आहेत. ते आता आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवणार? बाळासाहेबांचे विचार काय ते मी मुख्यमंत्री असताना करुन दाखवला. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर राज्यात गुंतवणूक होत होती. आता राज्यात गुंतवणूक नाही, तरुणांना रोजगार नाही, हे बाळासाहेबांचे विचार आहे. बाळासाहेबांनी नेहमी पहिले भूपुत्रांचा विचार केला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.