अनिलभैयांना श्रद्धांजली वाहताना उद्धव ठाकरेंचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला

"बाहेरुन आलेले काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात, काही जण मानत नाहीत" अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेत्री कंगना रनौतवर निशाणा साधला

अनिलभैयांना श्रद्धांजली वाहताना उद्धव ठाकरेंचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला
Follow us
| Updated on: Sep 07, 2020 | 5:19 PM

मुंबई : शिवसेनेचे दिवंगत नेते आणि माजी मंत्री अनिल राठोड यांना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेत्री कंगना रनौतला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. “बाहेरुन आलेले काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात, काही जण मानत नाहीत” अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी कंगनाला चपराक लगावली. (Uddhav Thackeray taunts Kangana Ranaut while Condolence motion to Anil Rathod)

“माझा ज्या गोष्टीवर अजूनही विश्वास बसत नाही, अशा अनिलभैया राठोड यांना मला श्रद्धांजली वाहावी लागत आहे. अनिल भैया हा आमचा, शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता. अनेक जण इतर प्रांतातून मुंबई आणि महाराष्ट्रात येतात. रोजी रोटी कमावतात, नाव कमावतात. काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात, काही जण मानत नाहीत.” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शोक प्रस्तावावेळी म्हणाले.

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतविरोधात जनक्षोभ उफाळला आहे. शिवसेनेने सुरुवातीपासून कंगनाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लावून धरली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली.

अनिल भैयांविषयी मुख्यमंत्री काय म्हणाले?

“माझा ज्या गोष्टीवर अजूनही विश्वास बसत नाही, अशा अनिलभैया राठोड यांना मला श्रद्धांजली वाहावी लागत आहे. अनिल भैया हा आमचा, शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता. अनेक जण इतर प्रांतातून मुंबई आणि महाराष्ट्रात येतात. रोजी रोटी कमावतात, नाव कमावतात. काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात, काही जण मानत नाहीत. अनिल भैया राजस्थानमधून महाराष्ट्रात आले. आधी मुंबई, मंचर आणि तिथेही मन रमेना म्हणून नगरला गेले. ज्यूसचा गाडीवाला माणूस ध्यानीमनी नसताना आमदार आणि मंत्री झाला. शिवसेना प्रमुखांच्या हिंदुत्वाच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी काम सुरु केलं. पण विचारांशी बांधिलकी, सक्रीय काम करत हा ढाण्या वाघ, जनतेचा माणूस होऊन काम करत राहिला.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पाहा व्हिडीओ :

(Uddhav Thackeray taunts Kangana Ranaut while Condolence motion to Anil Rathod)

कोण होते अनिल राठोड?

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनिल राठोड यांचे 5 ऑगस्टला निधन झाले. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.

अनिल राठोड यांनी अहमदनगर शहर मतदारसंघात सलग 25 वर्ष लोकप्रतिनिधित्व केले होते. शिवसेनेच्या तिकिटावर 1990 ते 2014 अशा सलग पाच टर्म ते आमदारपदी निवडून आले होते. 2009 मध्ये त्यांच्याकडे शिवसेना उपनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. शिवसेना-भाजप महायुती सरकारच्या काळात त्यांच्याकडे महसूल राज्यमंत्रीपदाची धुरा होती.

सहकार आणि साखरसम्राटांच्या जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवण्याचे काम राठोड यांनी केले. राठोड यांची ‘मोबाईल नेता’ अशी ओळख निर्माण झाली होती. सर्वसामान्यांच्या हाकेला एका फोनवर धावून जात ते लोकांचे प्रश्न सोडवत असत. तसेच सर्वत्र ते ‘भैया’ नावाने प्रसिद्ध होते.

संबंधित बातम्या :

मुंबई, मराठी माणसाबद्दल आक्षेपार्ह बोलणारे कोणीही असो, आमच्यातलेही, तरी माफी मागावीच लागेल : संजय राऊत

कंगनाने सलमान खानला पटवण्याचा खूप प्रयत्न केला, तेव्हा तो म्हणाला होता… : राखी सावंत

मुंबईनं मला यशोदा आईसारखं स्वीकारलं, मुंबई माझी कर्मभूमी, कंगनाला उपरती

(Uddhav Thackeray taunts Kangana Ranaut while Condolence motion to Anil Rathod)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.