भाजपला टीकेबद्दल ‘भारतरत्न’ द्यायला हवा; संजय राऊतांची टोलेबाजी

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज जोरदार राजकीय फटकेबाजी केली. (uddhav thackeray will be next Prime Minister says sanjay raut)

भाजपला टीकेबद्दल 'भारतरत्न' द्यायला हवा; संजय राऊतांची टोलेबाजी
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 4:58 PM

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज जोरदार राजकीय फटकेबाजी करत भाजपची अक्षरश: पिसे काढली. कोणत्याही गोष्टींवर टीका करण्याची भाजपची जुनीच सवय आहे. भाजपचे काही लोक त्यात आघाडीवर असतात, अशा लोकांना भारतरत्न पुरस्कारच दिला पाहिजे, असा चिमटा काढतानाच आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. (uddhav thackeray will be next Prime Minister says sanjay raut)

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार टीका करतानाच आगामी काळात राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेतही दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केल्याने त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे. या टीकेचा राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. भाजपचे काही लोक टीका करत आहेत. कोणत्याही विषयावर ते टीका करत असतात. टीका करणाऱ्या भाजपच्या काही लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. भाजपमधील काही लोकांना पीएचडी तर काहींना डीलिट दिली पाहिजे, असा टोमणाही त्यांनी लगावला. त्यांना लोकं मारायची आहेत. मुख्यमंत्र्यांना लोकांचा जीव वाचवायचा आहे. संचारबंदी लावण्याचा मुख्यमंत्र्यांना आनंद होत नाही, तुमचा जीव वाचावा म्हणून त्यांनी संचारबंदी लागू केली आहे, असं ते म्हणाले.

मोदींचे दौरे आणि राऊतांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेले कित्येक महिने परदेशात गेलेले नाहीत. त्यामुळे परदेशात कोरोनाची काय स्थिती आहे हे भाजपवाल्यांना कळणार नाही. जरा परदेशात काय चाललं ते पाहा. ब्रिटनमधून होणारी विमानसेवा 42 देशांनी बंद केली आहे. कशासाठी केली आहे? काही कळतं का भाजपला? असा सवालही त्यांनी केला.

इतके हतबल सरकार पाहिले नाही’

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुनही त्यांनी भाजपला लक्ष्य केले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकार हतबल झाले आहे. गेल्या 50 वर्षात इतकं हतबल सरकार कधीही दिसले नाही, असा हल्ला चढवतानाच दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा आहे. मात्र, हे आंदोलन राजकारणविरहीत असल्यामुळे शिवसेना या आंदोलनात सहभागी होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भूकंपाचा केंद्रबिंदू शिवसेना भवन

अनेक पक्षाचे कार्यकर्ते आपल्याकडे येत आहेत. तीन पक्ष एकत्र आल्याने आगामी काळात एकाच पक्षातून इनकमिंग होणार असल्याचा दावा राऊत यांनी केला. महाराष्ट्राचं नेतृत्व तीन पक्षाच्या नेत्यांनी करायचं ठरवलं आहे. आमचा एकही आमदार फुटणार नाही असं विरोधक म्हणत आहे. पण थोडे दिवस थांबा, काय काय होतंय दिसेल. भविष्यात ज्या घडामोडी घडतील त्याच्या भूकंपाचं केंद्रबिंदू शिवेसेनाभवन असेल, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

उत्तर महाराष्ट्रातील अनेक राजकीय कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करताहेत. पूर्वी ते कुठे होते हे आपण आता बोलायचं नाही. उद्योग आघाडी शिवसेनेसोबत आली आहे. आज हे सभागृह भरलं असतं पण कोरोनाच्या अडचणी आहेत, असंही ते म्हणाले.

राजकीय भूकंप झाल्यास नवल वाटणार नाही

राजकारणात आमचा माणूस फुटणार नाही, असं बोलायच असत. त्यामुळेच विरोधक तसे बोलत आहेत, असं सांगतानाच विरोधी पक्षामध्ये मूळचे कमी आणि बाहेरचे लोक जास्त आहेत. त्यामुळेच या बाहेरच्या लोकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यांचीही अस्वस्थता पाहता उद्या जर आम्ही काहीही न करता राजकीय भूकंप झाला तर त्याचे नवल वाटणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

छोटं युद्ध लढलो आणि जिंकलो

पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीचं एक छोटसं युद्ध होतं. ते आम्ही एकत्र मिळून लढलो आणि जिंकलो. त्यामुळे आगामी काळात अशी युद्धे लढावीच लागतील, असं त्यांनी सांगितलं.

सानप आले काय आणि गेले काय

यावेळी त्यांनी माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या भाजप प्रवेशाची खिल्ली उडवली. बाळासाहेब सानप शिवसेनेत आले तेव्हा काहीच फायदा झाला नव्हता, अशी मिश्किल टिप्पणी करतानाच त्यांच्या जाण्याने नुकसान होण्याचा प्रश्नच येत नाही, अशी खोचक प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का?

यावेळी त्यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्यावरही त्यांचं नाव न घेता टीका केली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जे लोक नाव घेतात त्यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार तरी आहे का? या लोकांनी आपल्याला बाळासाहेबांचं नाव घेण्याचा खरंच अधिकार आहे का? याचा स्वत: विचार करावा, आत्मपरीक्षण करावं, असं टोलाही त्यांनी लगावला. (uddhav thackeray will be next Prime Minister says sanjay raut)

नाशिक पालिकेवर भगवा फडकवायचाय

नाशिक आणि धुळे दोन्हीही शहरं महत्वाची आहेत. नाशिकच्या महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. नाशिक कायम सेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मागच्या 5 वर्षात काय झालं ते सोडा, आता काय होणार आहे ते पाहा, असंही ते म्हणाले.

नाशिक, धुळ्यात भाजपला खिंडार

यावेळी नाशिक आणि धुळ्यातील भाजपच्या असंख्य कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. आगामी काळातही एकाच पक्षातून शिवसेनेत इनकमिंग होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. उद्धव ठाकरे हे आजही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक म्हणून काम करत आहेत. आम्हीही त्यांच्या नेतृत्वातच काम करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. सत्ता सत्तेच्या ठिकाणी असते. राज्यात आपलं सरकार आहे. आपण काम करत राहायचं. शेवटी महाराष्ट्रातील जनतेला शिवसेनेकडून खूप अपेक्षा आहेत, असं त्यांनी सांगितलं. (uddhav thackeray will be next Prime Minister says sanjay raut)

संबंधित बातम्या:

सानपांच्या जाण्याने नुकसान व्हायला त्यांच्यामुळे फायदा तरी कुठे झाला?: राऊत

‘शिवसेनेच्या हिंदुत्वाला बाळासाहेबांचा वारसा; भाजपचं हिंदुत्व म्हणजे नाटकबाजी’

Live | आता महापालिका क्षेत्राबाहेरही नाईट कर्फ्यु शक्य, जिल्हाधिकाऱ्यांनाही दिले नाईट कर्फ्युचे अधिकार

(uddhav thackeray will be next Prime Minister says sanjay raut)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.