Uddhav Thackeray | महाराष्ट्रात मोदींचं नाही बाळासाहेबांचं नाव चालतं, मुंबईतल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी ठणकावलं, 5 वक्तव्यं महत्त्वाची!

मुंबई इलेक्ट्रॉनिक्स वर्कर्स युनियनच्या 50 वर्षांच्या वाटचालीला शुभेच्छा देताना उद्धव ठाकरे यांनी येथील नेतृत्वाचेही कौतुक केले. ते म्हणाले, ' 50 वर्ष युनियन एकछत्री ठेवणं तुम्हालाही धन्यवाद. आपल्या येथे महाराष्ट्राचे द्वेष्टे आहेत.. त्यांना मराठी अस्मिता तोडून टाकायची. पण   तुटू देऊ नका..

Uddhav Thackeray | महाराष्ट्रात मोदींचं नाही बाळासाहेबांचं नाव चालतं, मुंबईतल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी ठणकावलं, 5 वक्तव्यं महत्त्वाची!
उद्धव ठाकरेंची मुंबईतील एका कार्यक्रमात भाजपवर सणकून टीका Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 11:39 AM

मुंबईः आगामी महापालिका निवणुकांमध्ये (Municipal Corporation) मुंबईवर भाजपचा डोळा आहे. पण भाजपला माहिती नाही, महाराष्ट्रात, मुंबई मोदींचं नाही तर बाळासाहेबांचं नाव चालतं… शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात भाजपला ठणकावून सांगितलं. मुंबईतल्या इलेक्ट्रॉनिक्स वर्कर्स युनियनच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी कामगारांना संबोधित करताना मुद्दाम काही गोष्टींवर भर दिला. कामगारंनो, तुम्ही मुंबईतल्या लाखो घरांमध्ये जाऊन दिवे लावतात. त्यामुळे सध्या जो काळा बाजार सुरु आहे, त्याविषयी लोकांच्या घरात प्रकाश टाका, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. भाजपचे (BJP) लोक सध्या आमदार, खासदार, एवढंच काय तर शिवसेनेची, बाळासाहेबांची स्वप्नही चोरतायत. हा पक्ष आहे की चोरबाजार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात बोलताना केला. तसेच एकनाथ शिंदे सरकारवर खोक्यांवर जी टीका होतेय, त्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात खिल्ली उडवली.

खोक्यातून सरकारचा जन्म…

एकनाथ शिंदे सरकारवर खोके घेऊन आलेलं सरकार अशी टीका होतेय. उद्धव ठाकरे यांनी हाच मुद्दा कार्यक्रमात उचलून धरला. मी काहीच बोलत नाहीये तर जनता बोलतेय, हे सांगताना ते म्हणाले, ‘ सध्या 50 खोके एकदम ओके अशी घोषणा व्हायरल होतेय. लोकं चिडवतायत. तुम्ही लोकं घरोघरी जाऊन दिवे लावता, तसे या काळ्या करभारावरही प्रकाश टाकला पाहिजे. हे खोकं सरकार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात आम्ही कोट्यवधींची कामं केली. कागदोपत्री असलेली कामं प्रत्यक्षात आणली. पण या सरकारने अनेक कामांना स्थगिती दिली. कारण यांचा जन्मच खोक्यातून झालाय…

पक्ष आहे की चोरबाजार?

भाजपच्या जिव्हारी लागणारं आणखी एक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात केलं. ते म्हणाले, मुंबई महापालिका निवडणूक जवळ आली आहे. त्यासाठीच भाजपचं राजकारण सुरु आहे. दुसऱ्या पक्षातून आमदार, खासदार एवढंच काय तर स्वप्नही चोरायचे… त्यामुळे हा पक्ष आहे की चोरबाजार, असा प्रश्न पडतो…

महाराष्ट्रात, मुंबईत बाळासाहेबांचंच नाव!

महाराष्ट्रातून शिवसेना संपवण्याचे भाजपचे मनसुबे असले तरीही हे शक्य नाही, असं उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या कार्यक्रमात ठणकावून सांगितलं. ते म्हणाले, भाजपबरोबर 25 वर्ष युतीत सडली. शिवसेना बाहेर पडली तरीही ते थांबलेले नाहीत. महाराष्ट्रात बाळासाहेबांशिवाय मतं मिळू शकत नाही, हे त्यांना माहिती आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात मोदींचं नाही तर बाळासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय कुणीही मतं देत नाहीत….

दसरा मेळाव्यात तोफ धडाडणार

यंदाच्या दसरा मेळाव्यात उघडपणे बोलणार असल्याचं सूतोवाच उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात बोलताना केलं. ते म्हणाले, ‘ आता मी मास्क काढून बोलतोय, त्यामुळे खूपच बोलत सुटलोय. पण आता जास्त बोलत नाही. थेट मैदानावरच बोलेन. गेल्या वर्षी नाईलाजास्तव दसऱ्याचा कार्यक्रम हॉलमध्ये घ्यावा लागला होता. या वेळेला दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेणार….

मराठी अस्मिता तुटू देऊ नका…

मुंबई इलेक्ट्रॉनिक्स वर्कर्स युनियनच्या 50 वर्षांच्या वाटचालीला शुभेच्छा देताना उद्धव ठाकरे यांनी येथील नेतृत्वाचेही कौतुक केले. ते म्हणाले, ‘ 50 वर्ष युनियन एकछत्री ठेवणं तुम्हालाही धन्यवाद. आपल्या येथे महाराष्ट्राचे द्वेष्टे आहेत.. त्यांना मराठी अस्मिता तोडून टाकायची. पण   तुटू देऊ नका, तुटू नका,  फुटू नका, घेतला वसा टाकू नका…

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.