उद्धव ठाकरेंची ‘ती’ भूमिकाच चुकीची, राज ठाकरेंनी सांगितला युतीचा खरा फॉर्म्युला..!
चार भिंतीमध्ये ठरले ते उद्धव ठाकरे यांनी जनतेला सांगायला पाहिजे होते. नेमका फॉर्म्युला काय हे अधिकृत सांगणे गरजेचे होते.
नागपूर : शिवसेनेतील ((Shivsena Party) ) 40 आमदारांच्या बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( (Uddhav Thackeray)) यांच्या नेतृत्वावरच विरोधकांकडून सवाल उपस्थित केला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ((Raj Thackeray) ) यांनी तर यावर कायम बोचरी टीका करीत सर्व चूक ही नेतृत्वाची असून विरोधकांनी त्याचे श्रेय घेऊ नये असे म्हणत उद्धव ठाकरे यांना खडेबोल सुनावले होते. शिवाय युतीच्या फॉर्म्युल्याचे कारण देत बाहेर पडल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, ज्याचे आमदार जास्त त्याच पक्षाचा मुख्यमंत्री हे गणित गेल्या कित्येक वर्षापासून कायम राहिलेले आहे. शिवाय हा खरा फॉर्म्युला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. केवळ स्वार्थासाठी घेतलेला निर्णय अखेर फसला असेच काय ते झाले असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
चार भिंतीमध्ये ठरले ते उद्धव ठाकरे यांनी जनतेला सांगायला पाहिजे होते. नेमका फॉर्म्युला काय हे अधिकृत सांगणे गरजेचे होते. तसे न करता राजकीय स्वार्थ साधण्यासाठी निर्णय घेतला. पण त्यांच्या एका निर्णयाने जनतेची फसवणूक झाल्याचा घणाघात राज ठाकरे यांनी केला आहे.