Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इनोव्हेटीव्ह साताराचं स्पेलिंग अचूक न सांगता येणाऱ्यांनी बोलू नये, उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना टोला

खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle ) यांनी फेसबुक पोस्टद्वारे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhonsle) यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

इनोव्हेटीव्ह साताराचं स्पेलिंग अचूक न सांगता येणाऱ्यांनी बोलू नये, उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना टोला
शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 8:27 AM

सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle ) यांनी फेसबुक पोस्टद्वारे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhonsle) यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. सातारा (Satara) शहराच्या व शहरवासीयांच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही सुरु केलेली इनोव्हेटीव्ह सातारा ही योजना, समाजाची आणि समाजहित साध्य करुन घेण्याची चिरकाल चालणारी योजना आहे. ज्या लोकांना इनोव्हेटीव्ह सातारा या शब्दाचा अर्थ आणि शब्दाचे स्पेलिंग अचूक सांगता येणार नाही त्यांनी आमच्या इनोव्हेटीव्ह सातारा या उपक्रमाविषयी काही बोलू नये, असा टोला उदयनराजे भोसले यांनी लगावला आहे. सातारा पालिकेच्या निवडणूक जवळ आल्या की वातावरण निर्मितीसाठी खासदार उदयनराजे भोसले नेहमीच स्टंटबाजी करून सातारकरांना विकासाची खोटी स्वप्न दाखवतात. त्यामुळे सातारकरांना त्यांच्या त्यांच्या खोटेपणाची जाणीव झाल्याने त्यांना सातारा विकास आघाडीचा पराभव दिसू लागला आहे. खासदार सध्या कोट्यवधींच्या विकासकामांची खोटी स्वप्ने दाखवत आहेत. मात्र, हा देखील विकास नुसता कागदावरच पाहायला मिळणार आहे,अशी टीका शिवेंद्रराजे भोसले यांनी केली होती. उदयनराजे भोसले यांनी फेसबुक पोस्टद्वारे जोरदार उत्तर दिलं आहे.

उदनयराजे भोसले नेमकं काय म्हणाले?

जनमानसात आमची एक वेगळी छबी आहे. आम्ही सामान्य जनतेकरीताच आजपर्यंत जीवन व्यतीत केले आहे. काहींना आमची धडाडी आणि लोकप्रियता खुपत असते म्हणूनच कथित भ्रष्टाचाराचे मोघम आणि बिनबुडाचे आरोप करणे हा त्यांचा स्थायी भाव बनला आहे. लोकांच्या गतीमान सोयी , सुविधांसाठी कोणत्या योजना राबविणे, लोकहिताची अंमलबजावणी करणे ही जर भ्रष्टाचाराची व्याख्या असेल तर होय.. आम्ही भ्रष्टाचार केला आहे, अशा शब्दात प्रत्युत्तर उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना दिलं आहे.

चोराच्या उलट्या बोंबा

स्वार्थ्याध भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. सहकाराचा गळा घोटून स्वाहाकार करुन आता रियल इस्टेटमध्ये घुसलेल्या व्यक्तींनी आजपर्यंत फक्त स्वार्थ पाहिलेला आहे. स्वार्थ नसेल तर त्यांचा कोणताही उपक्रम होत नाही, अश्या व्यक्तींना निस्वार्थीपणे नागरीकांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींची वाढती लोकप्रियता सहन होणारी नाही म्हणून त्यांची नेहमीच कुरकूर असते, अशी टीका उदयनराजे भोसले यांनी फेसबुक पोस्टद्वारे केलीय.

हा सूर्य आणि हा जयद्रथ करायला तयार

उदयनराजे हे नेहमीच समाजासाठी जगणारी व्यक्ती म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. कुणी कितीही उलट्या बोंबा मारत असले तरी त्या बोंबा मारणा-यांना समाजाने पुरते ओळखले आहे. शाश्वत विकासाच्या गप्पा ठोकणा-यांनी, चालवता आल्या नाहीत म्हणून दोन सहकारी बॅकांचे विलिनीकरण केले. तरीही उजळ माथ्याने हिंडणा-यांचा सहकारातील अचंबित करणारा शाश्वत विकास सभासद, नागरीकांनी पाहिला आहे. त्यांचे पोटात एक आणि ओठात एक या वैशिष्ठयाचा अनेकांना बसलेला झटका लोक विसरलेले नाहीत. म्हणून बेछुट, बेताल आरोप करुन, त्यांचा सुरु असलेला चारित्र हननाचा प्रयत्न यशस्वी होणार नाही.आम्ही त्यांच्या वक्तव्याला फारशी किंमतही देत नाही. संबधितांना तरीही आरोप करायचे असतील तर ते त्यांनी पुराव्यानिशी आणि चार-चौघात चर्चेला सामोरे जावून, सिध्द करुन दाखवावेत असे आमचे आव्हान आहे. खऱ्याला मरण नाही हा सूर्य आणि हा जयद्रथ करायला आम्ही तयार आहे, असं आव्हान उदयनराजे भोसले यांनी दिलं आहे.

उदयनराजे भोसले यांची फेसबूक पोस्ट

इतर बातम्या:

MPSC update : बनावट कागदपत्रांद्वारे अधिकारी झाल्याचं सांगत फसवणुकीचे प्रकार समोर, एमपीएससी कारवाईचा बडगा उगारणार

आश्रमशाळेतील विद्यार्थिनी होणार ‘डॉक्टर”; बदलापूरच्या शबानाचा ‘एमबीबीएस’ला प्रवेश, जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनंदन

पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय, यापुढे...
पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय, यापुढे....
'बॉम्ब घरात टाकून..', खोक्याला मारहाणीनंतर धमकी, वकिलांनी काय सांगितले
'बॉम्ब घरात टाकून..', खोक्याला मारहाणीनंतर धमकी, वकिलांनी काय सांगितले.
मुंबईकरांनो…लोकलनं प्रवास करताय? बघा उद्या कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक?
मुंबईकरांनो…लोकलनं प्रवास करताय? बघा उद्या कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक?.
'मग तुझ्या राज ठाकरेला सांगतो', मनसे नेता अन् सदावर्तेंमध्ये बाचाबाची
'मग तुझ्या राज ठाकरेला सांगतो', मनसे नेता अन् सदावर्तेंमध्ये बाचाबाची.
राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत मनसेच्या भूमिकेवर स्पष्टच म्हणाले...
राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत मनसेच्या भूमिकेवर स्पष्टच म्हणाले....
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.