मुंबई : राज्यामध्ये आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपाचे सरकार आहे. शिंदेंनी मोठी बडखोरी करत राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडले. आता राज्यामध्ये महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आल्या असून राज्यातील महाविकास आघाडी सरकारप्रमाणेच उल्हासनगर महापालिकेत (Ulhasnagar Municipality) देखील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यापासून महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही ठिक नसल्याची चर्चा कायमच आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नाना पटोले यांनीही महाविकास आघाडी संदर्भात मोठे विधान केले होते. जर राज्यातील महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली तर त्याचा थेट परिणाम हा उल्हासनगर महापालिकेमध्ये दिसणार आहे. उल्हासनगर महापालिकेच्या निवडणूका (Election) आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे सर्वच राजकिय पक्ष कामाला लागले आहेत.
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
काँग्रेस | ||||
अपक्ष |
उल्हासनगर महापालिकेच्या निवडणूकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा या निवडणूकीवर नेमका काय परिणाम होणार यावर आता चर्चा रंगताना दिसत आहेत. उल्हासनगर महापालिकेत एकूण 89 नगरसेवक आहेत. त्यात अनुसूचित जातीसाठी 15, अनुसूचित जमातीसाठी एक आणि महिलांसाठी 36 जागा राखीव आहेत. उल्हासनगर महापालिकेत एकूण 30 प्रभाग आहेत. उल्हासनगरची लोकसंख्या 5,06,098 एवढी आहेत. त्यात महिलांची संख्या 2,69,048 एवढी असून पुरुषांची संख्या 2,37,05 0 एवढी आहे. प्रभाग क्रमांक 12 अ मधून सविता प्रविण तोरणे, 12 ब गजानन प्रल्हाद शेळके, 12 क ज्योती प्रकास बठिजा, 12 ड दीपक लक्ष्मण मिरवानी हे निवडून आले होते.
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
काँग्रेस | ||||
अपक्ष |
उल्हासनगर पालिकेच्या निवडणूकीमध्ये प्रभाग क्रमांक 12 च्या निवडणूकीकडे विशेष: सर्वांच लक्ष लागले आहे. रियल पेटिकली मागील परिसर परेवा नं. 722 परिसर, शास्त्री नगर परिसर, एटीपी शाळा परिसर, जेकब कंपाउंड, रेवनकर यांचे घराचा परिसर, गुरुद्वारा परिसर, ऑक्सफोर्ड शाळा परिसर, सुभाष नगर परिसर, संत रोहिदास नौकने उल्हासनगर महानगरपालिका मार्ग मिरपुरी आश्रम, महापात्रहॉस्पिटलच्या उत्तरेकडील आंबेधाम मंदिर रोगल, मेडिकल स्टोअर पंजाबी कॉलनी, झुलेलाल मंदिर गल्लीच्या आजूने कांताबब्रच चांदीवर, जयसिंग कडिबा सुतार, अमृतसिंग अवतारसिंग यांचे येथे बारायण चौहान. जसवाल निवास पर्यंत प्रभाग विस्तारलेला आहे.
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
काँग्रेस | ||||
अपक्ष |