UMC Election 2022, Ward 15 : चुरस तर वाढणारच, प्रभाग क्रमांक 15चं जाणून घ्या हालहवाल!

| Updated on: Aug 17, 2022 | 8:23 AM

UMC Election 2022, Ward 15 : या प्रभात झोपडपट्टी परिसर अधिक आहे. या भागातील वॉटर, मीटर आणि गटरचे प्रश्न अनेक वर्षांपासून जैसे थे आहेत. त्यामुळे या भागातील मतदार काय कौल देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

UMC Election 2022, Ward 15 : चुरस तर वाढणारच, प्रभाग क्रमांक 15चं जाणून घ्या हालहवाल!
चुरस तर वाढणारच, प्रभाग क्रमांक 15चं जाणून घ्या हालहवाल!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेचा निकाल (umc election 2022) नेहमीच धक्कादायक लागलेला आहे. त्याचं कारण म्हणजे इथला मतदार. उल्हासनगरात (Ulhasnagar) सिंधी आणि मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर आहे. इथल्या सिंधी मतदारांवर पप्पू कलानी (pappu kalani) यांचं वर्चस्व आहे. तर मराठी मतदार हा काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष आणि मनसेत विभागला गेलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निकाल नेहमीच धक्कादायक, संमीश्र असा राहिला आहे. मात्र, कलानी यांच्याशिवाय कुणालाही पालिकेत सत्ता बनवता येत नाही हे सुद्धा तितकच खरं आहे. कलानी यांची मदत घेतल्याशिवाय कुणाचाही महापौर महापालिकेत बसत नाही. त्यामुळे यावेळी कलानी यांची मदत घेऊन राजकीय पक्षांना पुढे जावे लागेल की कलानी यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावून एखादा राजकीय पक्ष आपला महापौर उल्हासनगर महापालिकेत बसवतो हे पाहावं लागणार आहे.

चुरस वाढणार

प्रभाग क्रमांक 15 मध्ये तीन वॉर्ड येतात. वॉर्ड अ, ब आणि क. या तिन्ही वॉर्डात आरक्षण पडलं आहे. अ हा वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. ब हा वॉर्ड ओबीसी महिलांसाठी आणि क हा वॉर्ड खुला झाला आहे. त्यामुळे या प्रभागातील तिन्ही वॉर्डात विविध समाज घटकांना निवडणूक लढण्याची संधी मिळणार असल्याने चुरस वाढणार आहे.

प्रभाग क्रमांक 15 अ

हे सुद्धा वाचा
पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/ इतर

अनुसूचित जातीच्या हाती उमेदवारांचं भवितव्य

प्रभाग क्रमांक 15ची एकूण लोकसंख्या 19 हजार 512 एवढी आहे. या मतदारसंघात अनुसूचित जातीची लोकसंख्या 4 हजार 94 इतकी आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 349 एवढी आहे. म्हणजे या प्रभागातील तिन्ही मतदारसंघात अनुसूचित जातीच्या मतांचा अधिक प्रभाव राहणार आहे. त्यामुळे हे मतदार कुणाच्या बाजूने कौल देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रभाग क्रमांक 15 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/ इतर

वॉटर, मीटर आणि गटरचा मुद्दा गाजणार

या प्रभागात शांतीनगर परिसर, सातारा कॉलनी, सावित्रीबाई फुले नगर परिसर, गौबाई पाडा परिसर, बाबरे चाळ परिसर, इंद्र आशीर्वाद नगर, स्मशानभूमी चौक, वाघेला नगर, भैय्यासाहेब सोसायटी, पंचशील नगर, देवरस मार्बल, विकास टॉवर देशभक्ती मित्रमंडळ, गोपाल समाज परिसर, विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन परिसर, खन्ना कंपाऊंड, राजीव गांधी चौक परिसर, मिनाताई ठाकरे नगर, कोहिनूर अव्हेन्यू आणि ढाले पाडा आदी विभाग येतात. या प्रभात झोपडपट्टी परिसर अधिक आहे. या भागातील वॉटर, मीटर आणि गटरचे प्रश्न अनेक वर्षांपासून जैसे थे आहेत. त्यामुळे या भागातील मतदार काय कौल देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रभाग क्रमांक 15 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/ इतर