नवी मुंबईचे ‘गॉड’, शिवसेना, राष्ट्रवादी ते भाजप…; कसा आहे गणेश नाईकांचा राजकीय प्रवास?, वाचा!

आधी कट्टर शिवसैनिक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय, नंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खंदे समर्थक आणि आता भाजपवासी... नवी मुंबईचे गॉड म्हणून माजी मंत्री गणेश नाईक यांची ओळख आहे. (union leader turned politician, know about ganesh naik journey)

नवी मुंबईचे 'गॉड', शिवसेना, राष्ट्रवादी ते भाजप...; कसा आहे गणेश नाईकांचा राजकीय प्रवास?, वाचा!
ganesh naik
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 7:50 PM

मुंबई: आधी कट्टर शिवसैनिक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय, नंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खंदे समर्थक आणि आता भाजपवासी… नवी मुंबईचे गॉड म्हणून माजी मंत्री गणेश नाईक यांची ओळख आहे. राज्यातील मोठे नेते असूनही राज्यभर प्रभाव नसलेले आणि नवी मुंबई-ठाण्यापुरतेच मर्यादित राहिलेल्या नाईक यांची राजकीय कारकिर्द कशी आहे? त्यावर टाकलेला हा प्रकाश… (union leader turned politician, know about ganesh naik journey)

युनियन लीडर

गणेश नाईक यांचा जन्म 15 सप्टेंबर 1950चा आहे. 80च्या दशकात नाईक यांच्या राजकारणाला सुरुवात झाली. पनवेलजवळच्या रिलायन्स कंपनीत युनियन लीडर म्हणून त्यांचा लौकिक होता. आक्रमक कामगार नेता म्हणून त्यांची नवी मुंबईत ओळख निर्माण झाली होती. त्याचवेळी नाईकांची शिवसेना नेत्यांशी ओळख झाली आणि इथूनच नाईक यांचा शिवसेनेतून राजकीय प्रवास सुरू झाला.

मूळचे ठाणेकर, पण बनले नवी मुंबईकर

गणेश नाईक हे मूळचे ठाण्यातील आहेत. परंतु पनवेलजवळच्या रिलायन्स कंपनीत काम करत असताना युनियन लीडर म्हणून त्यांचा उदय झाला. नवी मुंबईत त्यांचे प्रस्थ वाढले आणि कार्यक्षेत्रही नवी मुंबईच झाले. त्यामुळे त्यांचा ठाणेकर ते नवी मुंबईकर असा प्रवास झाला.

शिवसेनेतून विजयी

शिवसेनेत असतानाच त्यांना संसदीय राजकारण करण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली. 1990मध्ये ते आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाले. 1995च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा विजय झाला. त्यावेळी राज्यात युतीची सत्ता आल्याने नाईक यांच्याकडे पर्यावरण मंत्रीपदाची सूत्रे आली. त्याचवेळी ते ठाण्याचे पालकमंत्रीही झाले.

नाराजीतून सेना सोडली?

युतीची सत्ता आल्यानंतर मनोहर जोशी आणि नारायण राणे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आलं. नाईक यांनाही मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. पण त्यांना मुख्यमंत्रीपद सोडाच, चांगलं मंत्रीपदही मिळालं नाही. त्यांना पर्यावरण मंत्रीपद देऊन त्यांची बोळवण केली गेली. त्यामुळे नाईक नाराज होते, त्याच नाराजीतून त्यांनी शिवसेना सोडल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. शिवसेनेत प्रदीर्घ काळ राहिल्यानंतर त्यांनी 1999मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीतून ते 2004 आणि 2009च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. पण 2014च्या विधानसभा निडवणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नाईक यांचा पराभव केला होता. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.

घराणेशाही आणि टीका

नाईक यांच्यावर घराणेशाहीचीही मोठी टीका झाली. नाईक यांनी दोन्ही मुलं आणि पुतण्याला महत्त्वाची पदे दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांचे चिरंजीव संजीव नाईक ठाण्याचे खासदार होते. तर धाकटे चिरंजीव संदीप नाईक ऐरोलीचे आमदार होते आणि पुतणे सागर नाईक नवी मुंबईचे महापौर होते. घरातच नाईक यांनी महत्त्वाची पदे दिल्याने त्यांच्यावर टीका होणं स्वाभाविक होतं.

नाईक आणि वाद

नाईक मितभाषी आहेत. ते सहजासहजी कुठल्या गोष्टीवर भाष्य करत नाहीत. मात्र, मधल्याकाळात त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप झाला. त्यानंतर त्यांच्या भाच्याच्या ग्लास हाऊसमुळे ते वादात अडकले होते. एमआयडीसीच्या जागेवर बांधलेल्या बावखळेश्वर मंदिरामुळेही ते अडचणीत आले होते.

भाजपमध्ये प्रवेश

राज्यात भाजपची लाट आल्याचं दिसून आल्यानंतर नाईक यांनीही भाजपची वाट धरली होती. राज्यात पुन्हा राष्ट्रवादी सत्तेत येणार नाही, भाजपच सत्तेत येईल याची जाणीव झाल्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. नाईक यांनी ऑक्टोबर 2019मध्ये नवी मुंबईतील 48 विद्यमान नगरसेवक आणि 70 माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादीला मोठं खिंडार बसलं आहे. (union leader turned politician, know about ganesh naik journey)

20 वर्षांपासून नवी मुंबई पालिकेवर वर्चस्व

नाईक यांनी गेल्या 20 वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. नवी मुंबईत आगरी समाजाची व्होटबँक सर्वाधिक असल्याने या व्होटबँकेच्या जोरावर नाईक यांनी नवी मुंबईत त्यांचं निर्विवाद वर्चस्व निर्माण केलं आहे. (union leader turned politician, know about ganesh naik journey)

संबंधित बातम्या:

‘भोळ्या शंकरा’, ‘पाणीदार आमदार’; जाणून घ्या, कोण आहेत शंकरराव गडाख?

पवारांचे खंदे समर्थक, कागलकरांच्या मनातला ‘हिंदकेसरी’; जाणून घ्या, कोण आहेत हसन मुश्रीफ?

वनवासातून पुन्हा सत्तेत, असं आहे अशोक चव्हाणांचं ‘राज’कारण!

(union leader turned politician, know about ganesh naik journey)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.