Nitin Gadkari letter to Maha CM : भावनिक साद आणि गर्भित इशारा, नितीन गडकरींच्या पत्रातील पाचवा स्फोटक मुद्दा

महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना मंजुरी देण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल, असा गर्भित इशारा देताना यामुळे महाराष्ट्राचे आणि जनतेचे नुकसान होईल, अशी भीतीही गडकरींनी व्यक्त केली आहे.

Nitin Gadkari letter to Maha CM : भावनिक साद आणि गर्भित इशारा, नितीन गडकरींच्या पत्रातील पाचवा स्फोटक मुद्दा
नितीन गडकरी आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 1:10 PM

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अतिशय स्फोटक पत्र लिहिलं आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामात शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा हस्तेक्षप वाढल्याने गेल्या काही महिन्यांपासून कामं रखडली असल्याचा आरोप पत्राच्या माध्यमातून नितीन गडकरी यांनी केला आहे. तसंच जर असेच प्रकार चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना मंजुरी देण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल, असा गर्भित इशारा देताना यामुळे महाराष्ट्राचे आणि जनतेचे नुकसान होईल, अशी भीतीही गडकरींनी व्यक्त केली आहे. गडकरींनी स्फोटक पत्रातून मुख्यमंत्र्यांना एकाचवेळी गर्भित इशारा आणि भावनिक सादही घातल्याचं दिसून येत आहे.

गडकरींची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद आणि गर्भित इशारा

गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रीय रस्ते विकासाची कामं रखडली आहेत. मी माहिती घेतल्यावर स्थानिक शिवसेना लोकप्रतिनिधींनी ही काम थांबवली असल्याचं मला कळलं. स्थानिक नेत्यांचे जर असेच प्रकार सुरु राहिले तर महाराष्ट्रात रस्त्यांच्या कामांना नवीन मंजुरी देण्याबाबत परत विचार करावा लागेल, असा इशारा गडकरींनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

नितीन गडकरी यांनी पत्रात रस्ते विकास प्रकल्पांची नावे सांगताना यामध्ये शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप होत असल्याचा मोठा आरोप केलाय. विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी आणि कंत्राटदार हैराण झाले आहेत. मागण्या पूर्ण न केल्याने काम बंद पाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे, अशीही तक्रार गडकरींनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

नितीन गडकरींच्या पत्रातील पाचवा मुद्दा काय?

शिवसेनेच्या नियमबाह्य कामामुळे आणि दहशतीमुळे राष्ट्रीय महामार्गाची कामं बंद पडतील, अशी भीती व्यक्त करताना, असंच जर चालत राहिलं तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील कामं मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल, असा गर्भित अशारा गडकरींनी मुख्यमंत्र्यांना दिलाय. त्याच्याही पुढे जाऊन या सगळ्यामधून महाराष्ट्राचे आणि जनतेचे नुकसान होईल, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना भावनिक सादही घातली आहे.

गडकरींनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र जशास तसं…

१. अकोला आणि नांदेड या २०२ किमी राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजेसमध्ये सुरु आहेत. गेडशी ते वाशिम या पॅकेज-२ मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (लांबी १२ किमी) निर्माण करण्याचे काम सुद्धा समाविष्ट आहे. परंतु, प्रस्तुत बायपास व मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबवले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.

२. या मतदारसंघात सुरु असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गेच काम एक पूल वगळता पूर्णत्वास आलेले आहे. या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचे काम अर्धवट स्वरुपात आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात आहे. काम सुरु केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याबाबत विनंती केली आहे.

३. पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे किंमत १३५ कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले. परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबवले होते, अशी माहिती मला देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरु केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी मशिनरीची जाळपोळ करुन कंत्राटदाराचे अधिकारी-कर्मचारी-कामगार यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे.

४. उपरोक्त बाबी लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरु ठेवावीत की कसे? याबद्दल आमचे मंत्रालय आता गांभीर्याने विचार करत आहे. ही कामे आहे त्या स्थितीत अंतिम केल्यास ती वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. अपघाताचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे जनतेच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल.

५. हे असंच चालत राहिलं तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील कामं मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल. यामुळे महाराष्ट्राचे आणि जनतेचे नुकसान होईल.

ही कामे डिस्कोप केली तरी आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरु. तसे झाले तर महाराष्ट्रातील नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायमची खंत राहील. ही कामे पुढे न्यायची असतील तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण यातून कृपया मार्ग काढावा, अशी माझी विनंती आहे.

(Union Minister Nitin Gadkari letter To Maharashtra Cm uddhav thackeray Over Shiv Sena interference in work of national highways)

हे ही वाचा :

Nitin Gadkari letter to Maha CM : उद्धवजी, शिवसेनेच्या नियमबाह्य आणि दहशतीमुळे रस्त्याची कामं बंद पडतील, नितीन गडकरींचं स्फोटक पत्र

Nitin Gadkari letter to Maha CM: महाविकासआघाडी सरकारवर गडकरींचा लेटरबॉम्ब, राज्यातील ‘या’ प्रकल्पांच्या कामात स्थानिक नेते अडथळे आणत असल्याची तक्रार

Nitin Gadkari letter to Maha CM : …तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांवरील कामांचा विचार करावा लागेल, गडकरींचं मुख्यमंत्र्यांना पत्र, वाचा जसंच्या तसं

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.