Nawab Malik | रावसाहेब दानवे म्हणतात, ‘नवाब मलिकांना राजकीय हेतूने अटक नाही’, मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचं राज्यभर आंदोलन
93 च्या बॉम्बस्फोटाच अनेकांचा बळी गेला होता, त्यांना आज ख-या अर्थाने श्रध्दांजली वाहण्याचा दिवस असून राज्यभर हा श्रध्दांजली दिवस भाजपाच्या कार्यकर्त्यांना राबवावा असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून केलं आहे
मुंबई – बुधवारी सकाळी नवाब मलिकांना (nawab malik) अटक केल्यानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी नवाब मलिकांना राजकीय हेतूने अटक केल्याचे सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून सांगितले. त्यावर भाजपचे नेते रावसाहेब दानवे (raosaheb danve) म्हणतात की, नवाब मलिकांना राजकीय हेतुने अटक करण्यात आलेली नाही, तर त्यांनी वादग्रस्त जमीन खरेदी केली असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली असा आरोप त्यांनी केला आहे. कारण बुधवारी सकाळी ईडीचे अनेक अधिकारी त्यांच्या घरी गेले होते. त्यानंतर त्यांच्या घरी त्यांची अनेक तास चौकशी झाली. त्यानंतर नवाब मलिकांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं. तिथून त्यांना जे. जे. रूग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आलं. तपासणी झाल्यानंतर त्यांना कोर्टात सादर करण्यात आलं. दोन्ही बाजूच्या युक्तीवाद झाल्यानंतर नवाब मलिकांना कोर्टाकडून 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली.
कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीने अटक केली आहे. हा राष्ट्राच्या सुरक्षेचा विषय असल्यामुळे मी भाजपाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, उद्या ९३च्या बॉम्बस्फोटांमध्ये नाहक बळी गेलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करून मलिकांविरोधात निदर्शने करावी. pic.twitter.com/pY5Aj4bM8r
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 23, 2022
मंत्रालय परिसरात महाविकास आघाडीचं धरणं आंदोलन
भाजपने सुडाचं राजकारण करीत नवाब मलिका अटक केल्याने आज महाविकास आघाडीतील अनेक नेते अटकेच्या निषेधार्थ मुंबईतील मंत्रालया शेजारी असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणं आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे अनेक नेते मुंबई दाखल झाले असून दहा वाजल्यापासून ते धरण आंदोलन करणार आहेत. काल अनेक झाल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांनी भाजप ईडीचा वापर चुकीच्या पध्दतीने करीत असल्याचा आरोप केला आहे. तसेच भाजपमधील अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी नवाब मलिकांना अटक झाल्यानंतर आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी चुकीच्या पध्दतीने जमीन खरेदी केली होती, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचं आंदोलन
93 च्या बॉम्बस्फोटाच अनेकांचा बळी गेला होता, त्यांना आज ख-या अर्थाने श्रध्दांजली वाहण्याचा दिवस असून राज्यभर हा श्रध्दांजली दिवस भाजपाच्या कार्यकर्त्यांना राबवावा असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून केलं आहे, त्याचबरोबर नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्याने त्यांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा यासाठी मागणीसाठी भाजप राज्यभर आंदोलन करणार असल्याचे देखील चंद्रकांत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हणाले आहे. तसेच भाजपाच्या अनेक नेत्यांनी ही राजकीय हेतूने कारवाई झाली नसून त्यांनी तशा पध्दतीचा गुन्हा दाखल केल्याने त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली आहे.