Congress vs Bjp : काँग्रेस कार्यालयाबाहेर जोरदार ‘राडा’, अचानक आले, गाड्या फोडल्या
Congress vs Bjp : काँग्रेस कार्यालयाबाहेर जोरदार 'राडा' झाला. तिथे उभ्या असलेल्या गाड्या फोडण्यात आल्या. या प्रकरणी भाजपावर आरोप करण्यात आला. ठराविक लोकसभा मतदारसंघातील लढती या प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. त्यामुळे प्रसंगी टोकाचा संघर्ष पहायला मिळतोय.
लोकसभा निवडणुकीदरम्यान देशातील काही मतदारसंघांकडे सगळ्यांचच लक्ष आहे. या मतदारसंघातील जनता कोणाच्या बाजूने कौल देणार? याची सर्वांनाच उत्सुक्ता आहे. उदहारणार्थ महाराष्ट्रातील बारामती. ठराविक लोकसभा मतदारसंघातील लढती या प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. त्यामुळे प्रसंगी टोकाचा संघर्ष पहायला मिळतोय. उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेर काही उपद्रवींनी गोंधळ घातला, तोडफोड केली. त्यानंतर आरोपी तिथून पसार झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रदर्शन करुन या गुंडगिरीचा विरोध केला. सध्या पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांवर तोडफोडीचा आरोप केला आहे.
अमेठीच्या गौरीगंज येथील केंद्रीय काँग्रेस कार्यालयात हे सर्व घडलं. कार्यालयाबाहेर काही गाड्या उभ्या होत्या. त्याचवेळी काही समाजकंटक तिथे आले, त्यांनी कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. राडा घालणारे नशेमध्ये होते. कार्यालयाच्या आत असलेले काँग्रेस कार्यकर्ते तोडफोडीचा आवाज ऐकून बाहेर आले, तो पर्यंत 6-7 गाड्यांमध्ये तोडफोड झालेली होती.
कार्यकर्त्यांच्या मनात संताप
काँग्रेस कार्यकर्त्यांनी तोडफोड करणाऱ्यांना पळवून लावलं. या घटनेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात संताप आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी तोडफोडीचा जोरदार विरोध केला. पोलिसांना या बद्दल कळवण्यात आलं. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कठोर कारवाईच आश्वासन देऊन परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला.
हार के डर से बौखलाई भाजपा
अमेठी में प्रशासन की मौजूदगी में भाजपाइयों ने जिला कार्यालय के बाहर खड़ी दर्जनों गाड़ियों में तोड़फोड़ की।
जिला अध्यक्ष प्रदीप सिंघल जी कार्यालय में ही मौजूद थे। उन्होंने कांग्रेसजनों के साथ उपद्रवियों को वहां से भगाया लेकिन पुलिस हर बार की तरह तमाशबीन… pic.twitter.com/xB0UvMV3kU
— UP Congress (@INCUttarPradesh) May 5, 2024
…तर ही लढाई आणखी प्रतिष्ठेची बनली असती
उत्तर प्रदेशातील अमेठीच्या निकालाकडे सगळ्यांचच लक्ष आहे. काँग्रेसचा हा परंपरागत लोकसभा मतदारसंघ. सध्या इथून भाजपाच्या स्मृती इराणी खासदार आहेत. राहुल गांधी या मतदरासंघातून निवडणूक लढवायचे. आता ते रायबरेलीमधून उभे आहेत. राहुल गांधी अमेठीमधून उभे राहिले असते, तर ही लढाई आणखी प्रतिष्ठेची बनली असती. अमेठीमध्ये आता भाजपाकडून स्मृती इराणी तर काँग्रेसकडून किशोरी लाल शर्मा यांना तिकीट देण्यात आलय.