BJP NDA | ‘माझ्यासोबत अन्याय’, मोदींच्या मंत्रिमंडळातून एका मंत्र्याचा राजीनामा, NDA मधून पहिली विकेट
BJP NDA | भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून पहिल्या पक्षाची विकेट पडली आहे. जागा वाटपात भाजपा सगळ्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण प्रत्यक्षात अस घडत नाहीय. एनडीए आघाडीमध्ये बरेच पक्ष आहेत. त्या सगळ्यांना सामावून घेण इतक सोपं नाहीय.
नवी दिल्ली : भाजपा सर्वांना सोबत घेऊन जागा वाटपाची बोलणी यशस्वी करण्याचा प्रयत्न करतेय. पण सगळ्यांना खुश ठेवण शक्य होत नाहीय. अशाच प्रयत्नात भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून पहिल्या पक्षाची विकेट पडली आहे. बिहारमध्ये जागा वाटप जाहीर झालय. NDA मध्ये जागा वाटपावर नाराज असलेले पशुपती पारस यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. पशुपती पारस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. मी प्रामाणिकपणे, निष्ठेने एनडीएची सेवा केली. माझ्या पक्षासोबत अन्याय झालाय. म्हणून मी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा देतोय असं पशुपती पारस यांनी म्हटलं आहे.
पशुपती कुमार पारस यांनी पत्रकार परिषद घेतली. मी माझा राजीनामा पाठवून दिला आहे. भरपूर प्रामाणिकपणे, निष्ठेने एनडीएची सेवा केली. आजही मी पीएम मोदींचा आभारी आहे. माझ्यासोबत अन्याय झालाय. आज केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा देतोय. पक्ष कार्यकर्त्यांसोबत बोलून पुढच्या निर्णयाची माहिती देईन असं पशुपती पारस यांनी म्हटलं आहे.
#WATCH | On NDA seat sharing, Bihar Deputy CM Samrat Chaudhary says, “NDA’s seat-sharing had been done yesterday. ‘Ab jinka nahi ho raha hai voh batayein’. BJP & NDA is ready to win all the seats in Bihar in the upcoming Lok Sabha elections” pic.twitter.com/8iPl5ngCJ4
— ANI (@ANI) March 19, 2024
त्यांची किती जागांची मागणी होती?
पशुपती यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर ते इंडिया आघाडीच्या संपर्कात आहेत. पशुपती आज संध्याकाळी पटना येथे पोहोचतील. तिथे त्यांची आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासोबत भेट होईल. पशुपती पारस यांनी इंडिया आघाडीकडे 6 जागा मागितल्या आहेत. आरजेडी तीन जागा देण्यास तयार आहे. नवादाच्या जागेवरुन पेच कायम आहे. आरजेडी नवादा सोडायला तयार नाहीय. पशुपति पारस हाजीपूर आणि प्रिंस राजला समस्तीपूरमधून निवडणूक लढवण्यासाठी राजी केलय.