‘बलात्काऱ्यांसाठी माझ्या कपड्यांना दोष देणं…’, चित्रा वाघ यांच्या ट्विटवर उर्फीचं सडेतोड उत्तर
'उत्तानपणे नंगटपणा करणाऱ्या या बाईला रोखण्यासाठी पोलिसांकडे कायदे आहेत की नाही?'; चित्रा वाघ यांच्या ट्विटवर उर्फी अखेर व्यक्त झालीच
Urfi javed on Chitra Wagh tweet : ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद कायम तिच्या विचित्र ड्रेसिंगमुळे चर्चेत असते. उर्फी सोशल मीडियावर स्वतःचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत सर्वत्र चर्चेत असते. महत्त्वाचं म्हणजे उर्फी तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोल करण्यात आलं. पण उर्फीने कायम ट्रोलर्सकडे दुर्लक्ष केलं. विचित्र ड्रेसिंग स्टाईलमुळे अभिनेत्री अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली आहे. एवढंच नाही, तर विचित्र कपडे घालून सर्वत्र फिरत असल्यामुळे उर्फीला अटक करण्याची मागणी देखील अनेकांनी केली. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Kishor Wagh) यांनी देखील उर्फीच्या कपड्यांचा विरोध केला.
एक ट्विट करत चित्रा वाघ यांनी उर्फीला अटक करण्याची मागणी केली. चित्रा वाघ यांच्या ट्विटवर उर्फीने देखील सडेतोड उत्तर दिलं आहे. उर्फी जावेद ट्विट करत म्हणाली, ‘बलात्काऱ्यांसाठी माझ्या कपड्यांना दोष देणं सहज सोपं आहे. माझ्यावर लक्ष केंद्रीत करून जनतेची दिशाभूल करताय…’
पुढे उर्फी म्हणाली, ‘तुम्ही अशा महिलांची मदत का नाही करत, ज्यांना खरंच तुमच्या मदतीची गरज आहे? महिलाचं शिक्षण, लाखो प्रलंबित बलात्कार प्रकरणं… या गोष्टी तुम्ही का नाही करत?’ असं देखील उर्फी ट्विटच्या माध्यमातून म्हणाली.
उर्फी जावेदच्या कपड्यांवर काय म्हणाल्या चित्रा वाघ? ट्विट करत त्या म्हणाल्या, ‘शी… अरे..हे काय चाललयं मुंबईत…उत्तानपणे नंगटपणा करणाऱ्या या बाईला रोखण्यासाठी पोलिसांकडे कायदे आहेत की नाही?’ असा प्रश्न देखील चित्रा वाघ यांनी ट्विट करत उपस्थित केला.
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, ‘तात्काळ बेड्या ठोका हीला एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये….’ असं म्हणत चित्रा वाघ यांनी उर्फीवर संताप व्यक्त केला. चित्रा वाघ यांच्या ट्विटनंतर उर्फीने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, उर्फी जावेद कायम विचित्र कपडे घालून सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेते. उर्फीच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे तिला अनेकदा ट्रोल देखील करण्यात आलं. पण अभिनेत्री कायम ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करून ती तिचा लूक कायम ठेवते.