मुंबई : उत्तराखंडचे भाजपचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या कपड्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे अनेक लोकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनीदेखील ट्विटरवर या मुद्द्यावरुन भाजपला टोला लगावला आहे (Urmila Matondkar reaction on CM Tirath Singh Rawats statement about ripped jeans).
उर्मिला मातोंडकर नेमकं काय म्हणाली?
फाटलेली जीन्स राज्यातील कर्तबगार युवा सांभाळतील. पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय? असा खोचक सवाल उर्मिला मातोंडकर यांनी ट्विटरवर विचारला आहे. उर्मिला यांच्यासह अनेक दिग्गज महिलांनी ट्विटरवर तीरथ सिंह रावत यांना फटकारलं आहे. त्या सगळ्यांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोतच. पण त्याआधी हे प्रकरण नेमकं काय ते आधी जाणून घेऊयात (Urmila Matondkar reaction on CM Tirath Singh Rawats statement about ripped jeans).
मान्यवर… फटी हुई #jeans को तो देश का होनहार युवा संभाल लेगा.. लेकिन फटी हुई #economy का क्या..???#RippedJeansTwitter #rippedjeans
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) March 18, 2021
नेमकं प्रकरण काय?
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत काल (17 मार्च) देहरादून येथील एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी वादग्रस्त विधान केलं. तरुण-तरुणींना संस्काराचे महत्व पटवून देताना रावत यांची जीभ चांगलीच घसरली. “मी एकदा जयपूरहून येत होतो. तेव्हा काही सहकारी माझ्यासोबत होते. दुसऱ्या दिवशी करवाचौथचा सण होता. माझे काही सहकारी दिल्लीचे होते. ते म्हणाले की, वर्षभर पत्नीला नाराज ठेवतो, मात्र करवाचौथच्या या एका दिवशी तरी त्यांचे मन राखावेच लागेल. मग मी त्यांच्यासोबत दिल्लीला जाण्यासाठी निघालो. ज्यावेळी आम्ही विमानात बसलो तेव्हा माझ्या बाजूला एक महिला बसली होती. मी तिच्याकडे पाहिले तेव्हा खाली गमबूट, आणखी वर बघितलं तर तिच्या गुडघ्यावरची जीन्स फाटली होती, हात बघितले तर त्यामध्ये कडेच-कडे, असा तिचा एकूण अवतार होता”, असं रावत यांनी सांगितलं.
“मी तिची विचारपूस केली तेव्हा तिने दिल्लीला जात असल्याचे सांगितले. मी स्वयंसेवी संस्था (NGO) चालवते असे तिने सांगितले. मात्र, गुडघ्यावर फाटलेली जीन्स घालून ती एनजीओ चालवते, समाजात जाते, सोबत लहान मुलं आहेत, या सगळ्यातून काय संस्कार होणार?”, असा सवाल तीरथ सिंह रावत यांनी उपस्थित केला.
‘फाटलेली जीन्स घालणं म्हणजे हल्ली स्टेटस सिम्बॉल बनलंय’
सध्याच्या काळात फाटलेली जीन्स म्हणजे स्टेटस सिम्बॉल समजले जाते. व्यक्ती जितकी फाटलेली जीन्स घालेल तितकी ती श्रीमंत असे समजले जाते. या सगळ्यातून आपण समाजाला आणि आपल्या लहान मुलांना काय शिकवत आहोत? संस्कारांची सुरुवात ही घरातून होते. आपण जसं वागतो, त्याचंच लहान मुलं अनुकरण करतात. त्यामुळे लहान मुलांना घरातूनच चांगले संस्कार मिळाले पाहिजेत. आपण कितीही पुढारलेलो असलो तरी चांगले संस्कार मिळणे गरजेचे असते. त्यामुळे आपण आयुष्यात कधीही अपयशी ठरणार नाही, असेही तीरथ सिंह रावत यांनी म्हटले.
अभिनेत्रींनी मुख्यमंत्र्यांना फटकारले
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा, त्यानंतर अभिनेत्री गुल पनाग यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना सोशल मीडियावर फटकारले आहे. आमचे कपडे बदलण्याआधी स्वत:ची मानसिकता बदला, अशा शब्दात नव्या नवेली नंदाने इन्स्टाग्राम स्टेटसवर फटकारले आहे. याशिवाय ट्विटरवर अनेक युजर्सनी रावत यांच्यावर टीका केली आहे.
* Takes out ripped jeans.*
— Gul Panag (@GulPanag) March 17, 2021
हेही वाचा : शासनाकडून 3 कोटी रेशनकार्ड रद्द; आपलं रेशन कार्ड तर रद्द झालं नाही ना, पटापट तपासा