साहित्य संमेलनात ज्यांनी भाषण गाजवलं, त्या वैशली येडे लोकसभेच्या रिंगणात?
यवतमाळ : आमदार बच्चू कडू यांची ‘प्रहार’ संघटना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे या ‘प्रहार’कडून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. शेतकरी विधवा महिलांचे दु:ख सारस्वतांच्या मेळ्यात निर्धास्तपणे मांडणाऱ्या वैशाली येडे यांच्या नावाची यवतमाळ-वाशिमच्या जागेसाठी चर्चा सुरु झाल्याने राजकीय वर्तुळाचंही त्याकडे […]
यवतमाळ : आमदार बच्चू कडू यांची ‘प्रहार’ संघटना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे या ‘प्रहार’कडून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. शेतकरी विधवा महिलांचे दु:ख सारस्वतांच्या मेळ्यात निर्धास्तपणे मांडणाऱ्या वैशाली येडे यांच्या नावाची यवतमाळ-वाशिमच्या जागेसाठी चर्चा सुरु झाल्याने राजकीय वर्तुळाचंही त्याकडे लक्ष लागलं आहे.
आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या बैठकीत यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी वैशाली येडे यांना उमेदवारी देण्यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं एकमत झालं. मात्र, वैशाली येडे लढण्यास तयार आहेत का, हे अद्याप कळू शकलेलं नाही. वैशाली येडे यांनी प्रहार संघटनेच्या प्रस्तावाला अद्याप होकार दिलेला नाही.
शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होणारा जिल्हा अशी दुर्दैवाने यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. याच जिल्ह्यात 92 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं. या संमेलनाच्या नियोजित उद्घाटक ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल होत्या. मात्र, ऐनवेळी त्यांचं निमंत्रण रद्द करण्यात आल्याने, शेतकरी महिला वैशाली येडे यांनी संमेलनाच्या उद्घटान केले. शिवाय, सारस्वतांच्या व्यासपीठावरुन विधवा शेतकरी महिलांच्या व्यथा ठामपणे मांडल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या भाषणाची राज्यभर चर्चा झाली होती.
यवतमाळ-वाशिममधून काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उमेदवार आहेत. तर शिवसेनेकडून विद्यमान खासदार भावना गवळी यांनाच संधी मिळू शकते. त्यामुळे प्रहारकडून वैशाली येडे या रिंगणात उतरल्यास, त्यांना एका विद्यमान खासदारासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचा सामना करावा लागणार आहे.
VIDEO : वैशाली येडे यांचं साहित्य संमेलनात गाजलेलं भाषण