AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वंचितला धक्का, प्रवक्त्यांसह दोन नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अजितदादांची भेट फळाला!

वंचितचे प्रदेश प्रवक्ते आणि सोलापूर महापालिकेचे नगरसेवक आनंद चंदनशिवे आपल्या दोन नगरसेवकांसह राष्ट्रवादी प्रवेश करणार आहेत. त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती.

वंचितला धक्का, प्रवक्त्यांसह दोन नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अजितदादांची भेट फळाला!
VBA Spokeperson Anand Chandanshive Meet DCM Ajit pawar
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 8:48 AM

सोलापूर : वंचितचे प्रदेश प्रवक्ते आणि सोलापूर महापालिकेचे नगरसेवक आनंद चंदनशिवे आपल्या दोन नगरसेवकांसह राष्ट्रवादी प्रवेश करणार आहेत. त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती. अखेर चर्चेअंती त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या हातावर बांधण्याचा निर्णय घेतलाय.

आनंद चंदनशिवे दोन नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार!

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याच्या होत्या चर्चा. आनंद चंदनशिवे यांनी आधी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बरोबर सलगी केली होती. मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट देखील घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय.

सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादीची ताकद वाढणार

आनंद चंदनशिवे यांचा राष्ट्रवादी प्रवेशामुळे पालिकेतील राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. बहुजन समाज पार्टीतून आनंद चंदनशिवे यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला होता. मात्र आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकण्या निर्णय घेतलाय.आनंद चंदनशिवे यांच्यासोबत नगरसेवक गणेश पुजारी ,ज्योती बमगोंडा हे दोन नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.

कोण आहेत आनंद चंदनशिवे?

आनंद चंदनशिवे 2017 च्या महापालिका निवडणुकीत, दोन नगरसेवकासह निवडून आले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्याविरोधात शहर उत्तर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यात चंदनशिवे यांना 27 हजार मते मिळाली होती.

(vabnchit Bahujan Aaghadi Carporator Anand Chandanshive decided to joins NCP Met Ajit pawar)

हे ही वाचा :

वंचित आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राष्ट्रवादीच्या वाटेवर, अजित पवारांच्या भेटीसाठी सोलापुरातून मुंबईत

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.