Deglur Biloli Bypoll : सेनेचा नाराज नेता भाजपचा उमेदवार, काँग्रेसचं तिकीट घरात, आता वंचितचा उमेदवार ठरला!

नांदेडमधील देगलुर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. डॉ. उत्तम रामराव इंगोले यांना वंचितने उमेदवारी दिली आहे.

Deglur Biloli Bypoll : सेनेचा नाराज नेता भाजपचा उमेदवार, काँग्रेसचं तिकीट घरात, आता वंचितचा उमेदवार ठरला!
Prakash Ambedkar
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 3:13 PM

मुंबई : नांदेडमधील देगलुर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. डॉ. उत्तम रामराव इंगोले यांना वंचितने उमेदवारी दिली आहे. काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर (Raosaheb Antapurkar) यांच्या निधनाने देगलुरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. आता इथे तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेसने रावसाहेब अंतापूरकर यांचे सुपुत्र जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने शिवसेनेतून आलेले सुभाष साबणे यांना रिंगणात उतरवलं आहे.

वंचित आघाडीचा उमेदवार जाहीर

वंचित बहुजन आघाडीने पत्रक प्रसिद्ध करुन आपला उमेदवार घोषित केला. देगलुर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या 30 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार घोषित करत आहोत. डॉ. उत्तम रामराव इंगोले यांना उमेदवारी देत आहोत, असं वंचित आघाडीने म्हटलं आहे.

उमेदवाराचे नाव -डॉ. उत्तम रामराव इंगोले

शिक्षण- एम.बी.बी.एस.,एम.डी. (भूलतज्ञ)

व्यवसाय – १८ वर्षापासून देगलूर मध्ये नागरिकांना वैद्यकीय सेवा देत आहेत.

उमेदवाराचा परिचय

डॉ. उत्तम रामराव इंगोले मागील अनेक वर्षापासून वैद्यकीय सेवेसह सामाजिक कार्यात अग्रेसर असून फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या माध्यमातून व संविधान जागरण समितीच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने सामाजिक विषयावर जागरण व आंदोलने केले आहेत. मागील दोन दशकांपासून सातत्याने सामाजिक योगदान देताना वैद्यकीय क्षेत्रातही ते अग्रेसर आहेत रंजल्या गांजल्या यांच्या सेवेसाठी विशेषता ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी धन्वंतरी प्रतिष्ठान व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब जनतेची सेवा केली आहे.

ग्रामीण भागात सर्पदंश याविषयी असलेले अज्ञान दूर करण्यासाठी व त्यावर उपचार करण्यासाठी डॉ. उत्तम इंगोले यांनी ग्रामीण भागात जागरणा बरोबरच सर्पदंशावर प्रभावी उपचार करून शेकडो ग्रामीण रुग्णाचे प्राण वाचवले आहेत.

ग्रामीण भागातील आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी विशेषतः महिलांच्या आरोग्याच्या सोयी सुविधा यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. सामाजिक जाणिवा जागृत करताना रक्तदान सारख्या अति महत्त्वाच्या विषयावर ही त्यांनी कार्य केले असून ग्रामीण भागात अनेक रक्तदान शिबिरांचे आयोजन महापुरुषांच्या जयंत्या व विविध सामाजिक उपक्रमांच्या निमित्ताने त्यांनी आयोजित केले आहेत.

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय हाकेला ओ देऊन डॉक्टर उत्तम इंगोले यांनी गत लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचार व प्रसार कार्यासाठी तन-मन-धनाने योगदान दिले आहे.

मागील विधानसभा निवडणुकीतही पक्षाने दिलेल्या आदेशाचे पालन करून डॉक्टर इंगोले यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. उच्चशिक्षित असलेल्या डॉ. इंगोले यांनी वैद्यकीय सोबतच सामाजिक योगदानही दिले आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी च्या विचारधारेची कास धरून वंचितांचा सत्तेतील सहभाग वाढला पाहिजे यासाठी कार्यतत्पर राहत ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आदेशाचे पालन केले आहे.

(Vanchit bahujan Aaghadi Decided Uttam Ingole is Candidate for Deglur Biloli by poll election)

हे ही वाचा :

फडणवीसांनी नुकसानीची पाहणी करता करता शिवसेना नेता फोडला, देगलूर बिलोली पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला

Deglur Biloli bypoll : देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार जवळपास निश्चित

महाराष्ट्रातील देगलूरसह देशातील 30 विधानसभा आणि तीन लोकसभा पोटनिडणुकांचा कार्यक्रम जाहीर; 30 ऑक्टोबरला मतदान 

काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.