Tanaji Sawant : आगोदर निदर्शने आता थेट कार्यालयाची तोडफोड, शिवसैनिकांचे ‘टार्गेट’ तानाजी सावंत

तानाजी सावंत हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असले तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांडा-वाशी या मतदार संघाचे ते आमदार आहेत. एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यात राजकारण तर पुणे येथे त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत. महाविकास आघाडी सरकारची स्थापना होताच ते मंत्री पदासाठी आशादायी होते

Tanaji Sawant : आगोदर निदर्शने आता थेट कार्यालयाची तोडफोड, शिवसैनिकांचे 'टार्गेट' तानाजी सावंत
शिवसैनिकांकडून आ. तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड कऱण्यात आलीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 12:14 PM

पुणे :  (Shivsena) शिवसेनेतील बंडखोर आमदारांना घेऊन आता रोष व्यक्त केला जात आहे. दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी या आमदारांचे फलक उतरवण्यात आले तर ठिकठिकाणी फलकावर चिखलफेकही करण्यात आली. असे असताना (Tanaji Sawant) आ. तानाजी सावंत यांना शिवसैनिकांच्या रोषाला अधिक सामोरे जावे लागत आहे. त्याचा प्रत्यय गेल्या दोन दिवसांपासून येत आहे. यापूर्वी शिवसैनिकांनी पुणे येथील त्यांच्या कात्रजच्या कार्यालयसमोर निदर्शने केली होती तर शनिवारी या (Demolition of the office) कार्यालयाची थेट तोडफोडच करण्यात आली आहे. शिवसेना कट्टर असलेले सावंत दगाबाज कसे असे म्हणत शिवसैनिकांनी त्याच्या कार्यालयावर लाकडी दांडके घालून तोडफोड केली. या बंडामध्ये एकनाथ शिंदे पाठोपाठ तानाजी सावंत यांची भूमिका असल्याचा आरोप शिवसैनिकांमधून होत आहे. त्यामुळेच त्यांना या परस्थितीचा सामना करावा लागत आहे.

नेमके कोण आहेत तानाजी सावंत?

तानाजी सावंत हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असले तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांडा-वाशी या मतदार संघाचे ते आमदार आहेत. एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यात राजकारण तर पुणे येथे त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत. महाविकास आघाडी सरकारची स्थापना होताच ते मंत्री पदासाठी आशादायी होते पण त्यांची ही इच्छा पूर्ण न झाल्याने ते भाजपात प्रवेश करणार अशा वावड्याही उठल्या होत्या. मात्र, ते शिवसेनेत राहिले पण अलिप्त. आता बंडाच्या दरम्यान ते पुन्हा समोर आले आहेत. शिवाय या बंडासाठी त्यांनीच जुळवाजुळव केल्याचा आरोपही शिवसैनिकांचा आहे.

शिवसंपर्क अभियानात बोलून दाखवली होती नाराजी

राज्यात शिवसंपर्क सुरु असताना सोलापुरात नाराज तानाजी सावंत यांनी आपल्या मनातील खदखद ही बोलून दाखवली होती. सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडून दुय्यम वागणूक मिळत आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांची गळचेपी होतेय. त्यामुळे आपल्याच मित्रपक्षाबद्दल सर्वात आगोदर तानाजी सावंत यांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली होती. तेव्हापासून ते मतदारसंघ आणि पक्ष या दोन्हीपासूनही दूर होते.

हे सुद्धा वाचा

दोन दिवसांपूर्वीच झाली होती निदर्शने

बंडखोर आमदारांबद्दल शिवसैनिकांमध्ये असलेली नाराजी आता दिसून येऊ लागली आहे. दोन दिवसांपूर्वीच तानाजी सावंत यांच्या पुणे येथील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली होती. तर शनिवारी थेट कार्यालयात घूसुन तोडफोड केली आहे. शिवाय कार्यालयातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो देखील हटविण्यात आला आहे. पुण्यात असे निषेध केला जात असला तरी त्यांच्या मतदार संघ असलेल्या भूममध्ये त्यांच्या भूमिकेचे स्वागत करण्यात आले होते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.