वसई-विरार : वसई-विरार महानगर पालिकेचा 2021-22 या आर्थिक वर्षाचा (Vasai-Virar Municipal Corporation Budget) अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त संतोष देहेरकर यांनी प्रशासक गंगाधरन डी. यांना 11 वा महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला. वसई-विरार महापालिकेच्या अर्थसंकल्पात कुठल्याही प्रकारची करवाढ करण्यात आलेली नाही. तर, कोव्हिड-19, तसेच इतर आरोग्य सुविधांवर भरीव तरतूद देण्यात आली आहे (Vasai-Virar Municipal Corporation Budget For The Financial Year 2021-22 Presented).
वसई विरार शहर महानगरपालिका 2020-21 चा सुधारीत 1870.74 कोटी आणि सन 2021-22 चा मूळ 2000.28 कोटींचा अर्थसंकल्प प्रशासक गंगाधरण डी. यांना सादर केला.
– कोविड-19 मुळे रखडलेलया विकास कामांना गती मिळणार आहे. जुने रस्ते आता UTWT याने विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.
– वसईचा किल्ला, वसईचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रत्येकी 1 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
– सुनियोजित पद्धतीने शहराच्या विकासासाठी रस्त्यांचे जाळे विणण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
– मागासवर्गीय योजनांसाठी 29. 64 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भविष्यात पाण्याची कमतरता पडू नये यासाठी खोळसापाडा 1 आणि 2 धरण बांधण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात 231.90 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
– या अर्थसंकल्पात शहरातील कचऱ्याची समस्या सुटावी यासाठी पालिकेने विशेष जोर दिला आहे. यासाठी प्रशासनाने बायोमिथेन आणि बायोमायनिंगसाठी 147.54 कोटींचा प्रकल्प शासनाकडे सादर केला.
– सफाईसाठी यांत्रिक झाडू शहरात लवकरच येणार असल्याचे सूतोवाच अर्थसंकल्पात करण्यात आले आहे.
– संकल्पना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनेसाठी 10.48 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
ठरलं ! विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर, 8 मार्चला अर्थसंकल्प सादर होणारhttps://t.co/5YtuSKEOmU#anilparab | #Maharashtra | #Maharashtra | #uddhavthackeray | #ajitpawar | #balasahebthorat | @NCP | @INCMaharashtra | @ShivSena | @advanilparab
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 25, 2021
Vasai-Virar Municipal Corporation Budget For The Financial Year 2021-22 Presented
संबंधित बातम्या :
VIDEO: दादा प्रेसमध्ये थोडेच बोलले, बोलले ते थेटच, हिंमत असेल तर अविश्वास ठराव आणून दाखवा
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होणे अशक्य?, नेमके कारण काय?