Marathi News Politics MNS corporator Vasant More helps woman in midnight at Katraj and salute to PMPML driver and Conductor
मध्यरात्री एकट्या लेकुरवाळीला वसंत मोरेंची अशीही मदत, पीएमपीएमएल चालक आणि वाहकालाही सलाम!
मध्यरात्रीच्या सुमारास वसंत मोरे यांनी एका लेकुरवाळीला केलेली मदत पुणेकरांच्या चर्चेचा विषय ठरलीय. तर पीएमपीएमएलचे चालक आणि वाहकालाही पुणेकर सलाम करत आहेत.
वसंत मोरे यांची लेकुरवाळीला मदत, पीएमपीएमएल चालक, वाहकालाही सलामImage Credit source: ANI
पुणे : मनसेचे नगरसेवक वंसत मोरे (Vasant More) कोरोना काळातील कामगिरीमुळे चांगलेच चर्चेत आले. त्यांनी कोरोना रुग्णांचा योग्य उपचार आणि सोयी मिळाव्यात या मागणीसाठी हाती दंडुका घेत अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडल्या. तेव्हापासून वसंत मोरे पुणेकरांच्या आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अधिक हक्काचे आणि मर्जीतील बनले. आता तेच वसंत मोरे आपल्या अजून एका कामामुळे लोकांच्या मनात घर करत आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास वसंत मोरे यांनी एका लेकुरवाळीला केलेली मदत पुणेकरांच्या चर्चेचा विषय ठरलीय. तर पीएमपीएमएलचे (PMPML) चालक आणि वाहकालाही पुणेकर सलाम करत आहेत.
वेळ रात्री ११.४५ ची. ठिकाण कात्रज – कोंढवा राजस चौक, पुणे. मी काल नेहमीप्रमाणे चौकातील भटक्या कुत्र्यांना खायला घालायला गेलो तर एक @PMPMLPune ची बस पूर्ण लाईट लावून उभी होती आणि गाडीचा कंडक्टर गाडीभोवती फिरत होता. ड्रायव्हर त्याच्या सीटवर बसून होता.
१/५ pic.twitter.com/mqiCUshNPx
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) June 15, 2022
वसंत मोरेंची लेकुरवाळीला अशीही मदत
वसंत मोरे यांनी एक ट्वीट करत मंगळवारी मध्यरात्री घडलेला प्रकार सांगितला. मोरे नेहमीप्रमाणे रात्री उशिरा कात्रज-कोंढवा राजस चौकात भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी पीएमपीएमएलची एक बस त्यांना लाईट लागलेल्या अवस्थेत उभी असलेली दिसली. गाडीचा वाहक बसभोवती फिरत होता, तर चालक बसमध्येच बसून होता. थोडा संशय आल्यामुळे वसंत मोरे यांनी चालकाकडे विचारणा केली. तेव्हा चालकाने सांगितलं की आम्ही सासवडवरुन आलो आहोत. गाडीत एक महिला तिच्या छोट्या बाळाला घेऊन बसली आहे. त्या इकडे बाजूला राहतात. त्यांनी निघताना सांगितलं की त्यांना राजस चौकात त्यांचा दीर घ्यायला येईल. पण 15 मिनिटे झालं कुणीच आलं नाही किंवा त्यांचा फोनही लागत आहे. आम्हाला धड गाडी सोडता येईना आणि त्यांनाही. आता यावेळेला रिक्षाही मिळत नाही.
यात एक चूक घरच्यांची, एकटी ताई इतक्या रात्री इतक्या पिशव्या घेऊन का सोडली? बर सोडली तर मग नेण्यासाठी इतका निष्काळजीपणा का केला ? थोडे तरी शहाणे व्हा.
५/५
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) June 15, 2022
पीएमपीएमएलच्या चालक आणि वाहकालाही सलाम
वसंत मोरे हकिकत ऐकून घेतल्यानंतर चालकाला म्हणाले त्यांच्या दीर आला नाही म्हणून काय झालं. मीच त्यांचा दीर होतो. मग मोरे यांनी त्या महिलेला गाडीत घेतलं आणि सुखरुप त्यांच्या घरी पोहोचवलं. घराच्या दारात पोहोचवल्यानंतर त्या ताईचा फोटोही घेतला, असं मोरे यांनी ट्वीटमध्ये सांगितलं. तसंच मोरे यांनी MH – 12 RN 6059 या बसचे चालक आणि वाहकाचे आभार मानले. त्यांनी ताईला इतक्या रात्री एकटी उतरु दिली नाही. त्या दोघांची नावं एकनाथ नवरे आणि अरुण दसवडकर असल्याचं मोरेंनी सांगितलं. तसंच मोरे यांनी त्या महिलेल्या घरऱ्यांनाही खडे बोल सुनावले.