“…म्हणून मी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला”, वसंत मोरे यांनी सांगितले खरं कारण

काही दिवसांपूर्वी संजय राऊतांची भेट घेतली. येत्या 9 जुलैला मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार आहे, असे वसंत मोरेंनी सांगितले.

...म्हणून मी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, वसंत मोरे यांनी सांगितले खरं कारण
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 2:03 PM

Vasant More Joining Shivsena Thackeray Group : महाराष्ट्रात पुढील चार महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक नेत्यांकडून विविध मतदारसंघासाठीची चाचपणी केली जात आहे. त्यातच आता लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित गटात प्रवेश करणारे पुण्याचे दिग्गज नेते वसंत मोरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. वसंत मोरे यांनी लोकसभेत झालेल्या पराभवानंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे वसंत मोरे हे लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. आता त्यांन यामागचे कारण सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभव

वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला रामराम केला. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. शरद पवार यांची भेटही घेतली होती. मात्र, ही जागा कॉंग्रेसकडे गेल्याने येथून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली. पण, त्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.

त्यानतंर आता वसंत मोरे हे येत्या 9 जुलैला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. यानिमित्ताने त्यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी या प्रवेशामागे नेमकं कारण काय? याबद्दल खुलासा केला.

हे सुद्धा वाचा

वंचितच्या लोकांनी मला स्वीकारलं नाही

मी माझ्या आयुष्यातील पहिली शिवसेनेची शाखा याच चौकात काढली होती. मला खासदारकीची निवडणूक लढवायची होती. मी पहिल्यापासून अपक्ष का होईना निवडणूक लढणार यावर ठाम होतो. यानंतर मला वंचितची ऑफर आली. त्यावेळी मला एका संघटनेची गरज होती. तेव्हा मला वाटलं की वंचित बहुजन आघाडी म्हणून मी पुण्यात चांगलं काम करता येईल, ही माझ्यासाठी एक संधी आहे. पण वंचितमध्ये मला जे यश मिळायला हवं होत, ते कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार यांनी मला स्वीकारलं नाही. वंचितच्या काही ठराविक कार्यकर्त्यांनीच चांगले काम केलं, असे वसंत मोरे यांनी म्हटले.

…म्हणून मी ठाकरे गटात प्रवेश करणार

यानंतर वसंत मोरे यांना ठाकरे गटात प्रवेश घेण्यामागचे कारण विचारले असता त्यांनी त्यावरही भाष्य केले. मी काही दिवसांपूर्वी संजय राऊतांची भेट घेतली. येत्या 9 जुलैला मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. मी 9 जुलैला मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश घेणार आहे. आता महापालिका, विधानसभा या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मी कार्यकर्त्यांचा कौल घेतला. तो कौल घेतल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की मी सुरुवातीपासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी ठाकरे गटात प्रवेश करत आहे, असे वसंत मोरे म्हणाले.

तसेच त्यांनी मी बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी याबद्दल चर्चा केली. त्यांना फोनही केले होते, असेही वसंत मोरेने सांगितले.  दरम्यान वसंत मोरे हे मनसेकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ऐन लोकसभेवेळी त्यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकांची उमेदवारी मिळविली. त्यांच्या उमेदवारीचा भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी धसका घेतला होता.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.