लोकांवर विश्वास नसल्यानं जिवंतपणी स्टेडियमला नाव, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

देशाला काय नेता मिळाला आहे, लोक विसरुन जातील, अशी त्यांना भीती आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली. (Prakash Ambedkar Narendra Modi)

लोकांवर विश्वास नसल्यानं जिवंतपणी स्टेडियमला नाव, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रकाश आंबेडकर
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 11:22 AM

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाऐवजी मोटेरा (Motera) स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) नाव दिल्यावरुन टीका केली आहे. देशाला काय नेता मिळाला आहे, लोक विसरुन जातील, अशी त्यांना भीती आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली असून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. (VBA Chief Prakash Ambedkar slams PM Narendra Modi over changing name of Motera stadium)

प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका

मोटेरा स्टेडियमला नरेंद्र मोदींचे नाव दिल्यावरुन राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर टीका करताना देशाला काय नेता मिळाला आहे? लोक विसरुन जातील याची त्यांना भीती वाटत आहे. यांच्या मृत्यूनंतर लोक लक्षात ठेवतील की विसरतील याची चिंता आहे. यामुळे त्यांनी मृत्यूपूर्वीच स्टेडियमला नावं दिलेय, अशी टीका आंबेडकरांनी मोदींवर केली आहे.

प्रकाश आंबेडकरांचे ट्विट

राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

खरं किती चांगल्या प्रकारे बाहेर येते: राहुल गांधी खरं किती चांगल्या प्रकारे बाहेर येते, नरेंद्र मोदी स्टेडियम, अडानी एंड, रिलायन्स एंड, जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली, असं ट्विट करत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.

मोदीजी लवकरच त्यांच्यासारखे माजी पंतप्रधान होण्याची चिन्हे: भूपेश बघल

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघल यांनीसुद्धा मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. ही भाजपची परंपरा आहे. अटलजी जिवंत होते, तेव्हा अटल चौक हे त्यांच्या नावावर होते. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदावरून पायउतार झाले आणि छत्तीसगडमध्ये अटल चौक नामकरण करण्यात आले. मोदीजी लवकरच त्यांच्यासारखे माजी पंतप्रधान होण्याची चिन्हे आहेत, अशी टीका छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघल यांनी केलीय.

जितेंद्र आव्हाड यांना भाजपचं प्रत्युत्तर

अहमदाबादमधील सर्वात मोठ्या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांची तुलना थेट हिटलरशी केली आहे. “हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वत:चं नाव दिलं होतं”, असा टोला आव्हाडांनी मोदींना लगावला आहे. तर, सुधीर मुनंगटीवार यांनी आव्हाड यांना प्रत्युत्तर देताना, यांची स्मरणशक्ती 24 तासाच्या वरती राहत नाही, नाव देण्याचा निर्णय गुजरात क्रिकेट असोसिएशननं केला. नरेंद्र मोदींनी केलेला नाही, असं म्हटलं.

संबंधित बातम्या:

ग्रामपंचायतीच्या निवडणुका तोंडावर, आंबेडकरी नेत्यांमधील वाद कायम; आठवले म्हणाले…

मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडूंचा राजीनामा घेतला असता : प्रकाश आंबेडकर

शुद्रांनी देशातील राजकारण ताब्यात घ्यावं: प्रकाश आंबेडकर

(VBA Chief Prakash Ambedkar slams PM Narendra Modi over changing name of Motera stadium)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.