प्रकाश आंबेडकरांनी मतदारसंघ बदलला, अकोल्यातून लढणार नाहीत!
मुंबई : भारीप-बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते अॅड. प्रकाश आंबेडकर हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना तगडं आव्हान उभं राहणार आहे. विदर्भातील अकोला जिल्हा अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा बालेकिल्ला मानला जातो. किंबहुना, आतापर्यतं अॅड. प्रकाश आंबेडकर हे […]
मुंबई : भारीप-बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते अॅड. प्रकाश आंबेडकर हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना तगडं आव्हान उभं राहणार आहे.
विदर्भातील अकोला जिल्हा अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा बालेकिल्ला मानला जातो. किंबहुना, आतापर्यतं अॅड. प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारंसघातून लढणार, अशीच चर्चा होती. मात्र, अकोल्यातच पत्रकार परिषद घेऊन, प्रकाश आंबेडकरांनी आपण सोलापुरातून लढणार आहोत, अशी घोषणा केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून 2014 साली काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पराभूत करत, भाजपचे शरद बनसोडे हे विजयी झाले होते. मात्र, आता सोलापुरातून अॅड. प्रकाश आंबेडकर हे स्वत: लढणार असल्याने सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेससमोरील आव्हानं आणखी वाढणार आहेत.
अकोला आणि प्रकाश आंबेडकर समीकरण
अकोला हा भारिप-बहुजन महासंघाचा बालेकिल्ला मानला जातो. प्रकाश आंबेडकर हे भारिप-बहुजन महासंघाचे प्रमुख आहेत. 1998 आणि 1999 अशा दोनवेळी प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातून खासदारही होते. अकोला जिल्हा परिषदेसह महापालिकेतही प्रकाश आंबेडकरांच्या भारिप-बहुजन महासंघाची ताकद आहे.
निवडणुकीच्या तारखा जाहीर
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.
संबंधित बातम्या :
लोकसभा निवडणूक 2019 : प्रचार, मतदान ते निकाल, A टू Z माहिती