पैसे नसल्यावर उपचार कसे घ्यायचे? गरिबानं कुठं जायचं? महिलेचा रोहित पवारांना सवाल, पुढे काय झालं, तुम्हीच पाहा
कुटुंबातील व्यक्ती आजारी आहे. पैसे नसल्यानं पुढचे उपचार कसे करायचे? गरिबानं कुठं जायचं? असा सवाल एका महिलेनं आमदार रोहित पवार यांना विचारला. मग रोहित पवारांनीही त्या महिलेला धीर देत रुग्णालय प्रशासनाला फोन केला आणि मोफत उपचाराची सोय करुन दिली.
कोल्हापूर : कोरोना संकटाच्या काळात अनेकांच्या हातचं काम सुटलं, अनेकांवर उपासमारीची वेळ आली. आता महापुरामुळे होतं नव्हतं ते सगळं गेलं. त्यामुळे आजारी पडल्यावर उपचाराचा खर्चही त्यांना परवडत नसल्याचं पाहायला मिळत आहे. कोल्हापुरातही असाच एक प्रकार आज पाहायला मिळाला. कुटुंबातील व्यक्ती आजारी आहे. पैसे नसल्यानं पुढचे उपचार कसे करायचे? गरिबानं कुठं जायचं? असा सवाल एका महिलेनं आमदार रोहित पवार यांना विचारला. मग रोहित पवारांनीही त्या महिलेला धीर देत रुग्णालय प्रशासनाला फोन केला आणि मोफत उपचाराची सोय करुन दिली. (MLA Rohit Pawar’s help to a woman in financial difficulties)
पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आमदार रोहित पवार आज कोल्हापुरात दाखल झाले होते. त्यावेळी एका महिलेनं भरल्या डोळ्यांनी ‘कुटुंबातील व्यक्ती आजारी असून पैसे नसल्याने पुढचे उपचार कसे करायचे, गरिबानं कुठं जायचं? अशी व्यथा मांडली. त्या महिलेची व्यथा ऐकून रोहित पवार यांनीही लगेच संबंधित रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना फोन करुन तिथे मोफत उपचाराची सोय करुन दिली. या संवेदनशीलतेमुळे आमदार रोहित पवार यांची कोल्हापुरात सर्वत्र चर्चा होत आहे.
रोहित पवारांच्या फोनमुळे महिलेवरील ओझं हलकं झालं!
जनता अडचणीत असल्यावर लोकप्रतिनिधींची राजकीय इच्छाशक्ती आणि तातडीने निर्णय घेण्याची क्षमता जास्त गरजेची असते. आमदार रोहित पवार यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळं पूरस्थितीनं बाधित झालेल्या एका महिलेच्या डोक्यावरील मोठं आर्थिक संकट दूर झालंय. अनेक नेतेमंडळी नागरिकांच्या समस्या जाणून घेतात आणि आश्वासनं देऊन मोकळे होतात. मात्र, त्यावर अंमलबजावणी करण्याची त्यांची इच्छाशक्ती असणं गरजेचं असतं. मात्र, रोहित पवार यांनी त्या महिलेला केवळ आश्वासन न देता रुग्णालयात उपचाराचा खर्च माफ करत तिला मोठा दिलासा दिला आहे.
आमदार रोहित पवार यांनी एका फोनवर आर्थिक अडचणीत सापडलेल्या महिलेची समस्या सोडवली. रुग्णालयात फोन करून मोफत उपचाराची सोय! @RRPSpeaks @NCPspeaks @PawarSpeaks #RohitPawar #Kolhapur #ncp #floodvictims pic.twitter.com/mTqukGJW5q
— sagar joshi (@spjoshi11) August 4, 2021
इतर बातम्या :
ठाकरेंच्या उमेदवाराच्या मनगटावर फडणवीसांचे नाव, ‘नरेंद्र’ यांच्या हातावर ‘देवेन्द्र’ टॅटू
ज्यांना नीट वाचता येत नाही त्यांनी सल्ले देऊ नये, पडळकरांची रोहित पवारांवर बोचरी टीका
MLA Rohit Pawar’s help to a woman in financial difficulties