AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : विकेंड लॉकडाऊनची ऐशीतैशी, कव्वालीच्या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण

खुलताबाद परिसरातील एका कव्वालीच्या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील सहभागी झाले. इतकंच नाही तर त्यांच्यावर नोटांची मोठ्या प्रमाणात उधळण केली जात असल्याचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Video : विकेंड लॉकडाऊनची ऐशीतैशी, कव्वालीच्या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण
इम्तियाज जलील यांचा कव्वाली कार्यक्रमात सहभाग, नोटांची उधळण
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 4:23 PM

औरंगाबाद : कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात औरंगाबाद प्रशासनाच्या निर्णयाला जोरदार विरोध करणारे AIMIMचे खासदार इम्तियाज जलील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी औरंगाबाद प्रशासनाच्या कुठल्या निर्णयाला विरोध केला नाही तर थेट कोरोना नियमावलीलाच हरताळ फासल्याचं पाहायला मिळत आहे. खुलताबाद परिसरातील एका कव्वालीच्या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील सहभागी झाले. इतकंच नाही तर त्यांच्यावर नोटांची मोठ्या प्रमाणात उधळण केली जात असल्याचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. (Imtiaz Jalil’s participation in Qawwali program in Khultabad)

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. असं असताना खुलताबाद परिसरात कव्वालीच्या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कव्वालीच्या या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलीलही सहभागी झाले. त्याचबरोबर जलील जेव्हा व्यासपीठावर गेले तेव्हा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नोटांची उधळणही करण्यात येत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. इम्तियाज जलील यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून या व्हिडीओबाबत आता काय प्रतिक्रिया येतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा

शासकीय कामात अडथळा अणल्याप्रकारणी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दुकानांना सील ठोकल्यामुळे खासदार इम्तियाज जलील हे भडकले आणि त्यांनी 1 जून रोजी कामगार कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. त्यानंतर त्यांच्यावर ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. इम्तियाज जलील यांच्यासह 24 दुकानदारांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवाजवी दंड ठोठावल्या प्रकरणी इम्तियाज जलील हे कामगार कार्यालयात गेले होते. याचा व्हिडीओ समोर आला होता.

‘मुंबईतील एका मंत्र्याच्या सांगण्यावरुन माझ्यावर गुन्हा’

खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबईतील एका मंत्र्याच्या सांगण्यावरून आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केलाय. ‘मी कुठलीही दंगल केली नाही किंवा कुठलेही शास्त्र बाळगला नाही, तरीसुद्धा माझ्यावर ते कलम लावण्यात आलंय. मात्र, त्या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि इतरांना मी सांगतो की, माझ्यातला पत्रकार अजून मेला नाही. संसदेमध्ये मी या सगळ्यांना उघडे पाडेन, असा इशारा इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला दिलाय.

संबंधित बातम्या :

फडणवीसांनी माझं ‘ते’ मत ऐकलं असतं तर आज मुख्यमंत्री असते, आठवले बोलता बोलता बरंच बोलून गेले!

‘स्वप्निल लोणकरची आत्महत्या म्हणजे सरकारने केलेली हत्या’, आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात

MP Imtiaz Jalil’s participation in Qawwali program in Khultabad

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.