Video : ‘नाना.. हिंमत असेल तर सागर बंगल्यावर येऊन दाखव’, प्रसाद लाड यांच्याकडून एकेरी उल्लेख, पटोलेंना थेट आव्हान
नाना पटोले यांनी सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आंदोलनाचा इशारा दिलाय. तर पटोले यांच्या इशाऱ्याला मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना महाराष्ट्र काँग्रेसवर गंभीर आरोप केला होता. काँग्रेसमुळेच देशभर कोरोनाचा प्रसार झाला, असा दावा मोदी यांनी केला होता. मोदींच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांच्या नेतृत्वाखाली मागील काही दिवसांपासून राज्यभरात भाजप कार्यकर्ते आणि भाजप नेत्यांच्या घरावर आंदोलन केलं जात आहे. तर भाजपकडूनही काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येतंय. अशावेळी आता नाना पटोले यांनी सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर आंदोलनाचा इशारा दिलाय. तर पटोले यांच्या इशाऱ्याला मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी प्रतिआव्हान दिलं आहे.
आमदार प्रसाद लाड यांनी तर नाना पटोले यांचा थेट एकेरी उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येऊनच दाखवा, असं थेट आव्हान दिलं आहे. “नाना, तुझ्या आव्हानाला प्रतिआव्हान देतोय. तू उद्या सकाळी 10 वाजता येऊनच दाखव, नाही तुला उलटा प्रसाद दिला तर आम्ही पण भाजप कार्यकर्ते नाही. सागरवर तू ये, पाहतो तू कसा परत जातो ते”, अशा शब्दात प्रसाद लाड यांनी नाना पटोलेंना आव्हान दिलं आहे. दरम्यान, हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना लाड यांनी पटोले यांचा एकेरी उल्लेख टाळला आहे.
अती बोलघेवडेपणा बरा नाही नाना पटोले! तऱ्हेवाईक नाना पटोलेंनी सागर बंगल्याच्या जवळ तरी येऊन दाखवावे! मग बघूया! ते आहेत आणि भाजपचे कार्यकर्ते आहे. आता जशास तसे उत्तर मिळेल!
– आमदार प्रसाद लाड pic.twitter.com/QpuItb7bKm
— Prasad Lad (@PrasadLadInd) February 13, 2022
नानांच्या ‘स्वागता’साठी तयार राहा, लोढांच्या भाजप कार्यकर्त्यांना सूचना
तर मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी भाजप कार्यकर्त्यांना नाना पटोले यांच्या स्वागतासाठी तयार राहण्यास सांगितलं आहे. त्यामुळे सोमवारी काँग्रेसनं फडणवीसांच्या बंगल्यावर आंदोलन केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
नाना पटोले यांचा इशारा काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला कोरोना सुपरस्प्रेडर संबोधले. हे लांच्छन जनता कदापि सहन करणआर नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी माफी मागेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशारा पटोले यांनी मुंबईत दिला. तसंच पंतप्रधान मोदी छत्रपतींचा अपमान करत होते तेव्हा भाजप सदस्य बाक वाजवत होते, असा आरोप करत याचा निषेध म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर उद्या आंदोलन करणार असल्याचा इशारा नानांनी दिला आहे.
LIVE: पक्षप्रवेश आणि पदग्रहण समारंभ https://t.co/qSg6mFVdLB
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) February 13, 2022
इतर बातम्या :