सर्व काही गेलं…बापाला मुलाने मारलेली घट्ट मिठी पाहून तुम्हीही…; आदित्य आणि उद्धव ठाकरे यांचा व्हिडीओ व्हायरल

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर अखेर काल निकाल लागला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिला आहे. यावेळी नार्वेकर यांनी पक्ष चिन्ह आणि पक्षाचा ताबा शिंदे गटाकडे दिला आहे. पक्षाचं प्रतोदपदही शिंदे गटाला बहाल केलं आहे. पण दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं आहे. कुणालाही अपात्र केलेलं नाही. या निकालानंतर आदित्य ठाकरे यांनी एक व्हिडीओ व्हायरल केला आहे.

सर्व काही गेलं...बापाला मुलाने मारलेली घट्ट मिठी पाहून तुम्हीही...; आदित्य आणि उद्धव ठाकरे यांचा व्हिडीओ व्हायरल
Video of Aditya-Uddhav Thackeray went viralImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jan 11, 2024 | 5:38 PM

निवृत्ती बाबर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 11 जानेवारी 2024 : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. अध्यक्षांनी कुणाही आमादारांना अपात्र ठरवलं नाही. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. पण ठाकरे गटाचं चिन्ह आणि पक्षाचा ताबा मात्र शिंदे गटाकडे दिला आहे. तसेच शिंदे गटाचा प्रतोदच कायदेशीर असल्याचा निर्वाळाही दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या हातून पक्ष कायमचा गेला आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिवसैनिकांनी या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. याच घडामोडीत आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील फोटो पाहिल्यावर तुम्हालाही गलबलून आल्याशिवाय राहणार नाही.

आदित्य ठाकरे यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात काही फोटोही आहेत. मी नेहमीच तुमच्यासोबत राहील, असं कॅप्शन या फोटोला आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे. या व्हिडीओत चार पाच फोटो आहेत. त्यातील पहिल्या फोटोत आदित्य ठाकरे हे वडील उद्धव ठाकरे यांना कडकडून मिठी मारताना दिसत आहे. या फोटोच्या बाजूलाच दुसरा फोटोही दाखवण्यात आला आहे. त्यात वाघ आपल्या बछड्याला घट्ट बिलगून जाल. या व्हिडिओची आणि त्यातील फोटोची प्रचंड चर्चा होत आहे. हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

फोटो कधीचा?

हा फोटो आजचा नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी वडिलांना घट्ट मिठी मारत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हाचा हा फोटो आहे. हा निकाल पक्षाच्या विरोधात गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी हाच फोटो पुन्हा एकदा शेअर केला आहे. पण त्यासोबत वाघ आणि बछड्याच्या गळाभेटीचा फोटोही पोस्ट केला आहे. हा फोटो पाहिल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

हीच ती इंस्टाग्रामवरील व्हायरल पोस्ट –

किती फोटो?

या व्हिडीओत एकूण पाच फोटो आहेत. पहिला फोटो आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे यांची गळाभेट घेतानाचा आहे. त्यानंतरचे फोटो हे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतरचे आहेत. काही कार्यक्रमातील आहेत. तर काही विधानभवनाच्या प्रांगणातील आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.