Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : दानवे काय बोलतील नेम नाही? राहुल गांधींना ‘सांड’ म्हणता म्हणता ते काय काय बोलून गेले ऐका

सांड बैल म्हणजे न काम करणारा. सांडचा अर्थ यांनी जो कोणताही घेतला असेल आणि त्याचा जर विपर्यास केला असेल, तर मला असं वाटतं की आपलं अपयश झाकण्यासाठी कुणावर तरी खापर फोडणं हा काँग्रेसवाल्यांचा जुना धंदा आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले

Video : दानवे काय बोलतील नेम नाही? राहुल गांधींना 'सांड' म्हणता म्हणता ते काय काय बोलून गेले ऐका
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, काँग्रेस अध्यक्ष रावसाहेब दानवे
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 11:28 AM

जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या खुमासदार भाषणामुळे नेहमीच चर्चेत असतात. नवनिर्वाचित केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या जन-आशीर्वाद यात्रेत बोलताना मात्र दानवे यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करताना दानवे यांनी त्यांना थेट सांड अशी उपमा देऊन टाकली. त्यावरुन काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी दानवेंना प्रत्युत्तर दिलंय. (Raosaheb Danve’s explanation after the criticism on Rahul Gandhi)

नेमकं काय म्हणाले दानवे?

मी काल बदनापूरमध्ये भाषण करत असताना जनतेमधून काही प्रश्न मला विचारले. तेव्हा मी त्यांना शेतीतलं उदाहरण देऊन सांगितलं की, शेतीमध्ये दोन प्रकारचे बैल असतात. एक काम करणारा बैल आणि एक काम न करणारा बैल. शेतकऱ्यांनी मला विचारलं की काम करणारा बैल मला समजतो. पण न काम करणारा बैल कोणता? तेव्हा मी त्यांना सांगितलं की सांड बैल काम न करणारा बैल असतो. एका बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करणारे, तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी हे सांड बैल काम न करणारे. बैलाचे दोन प्रकार असतात, काम करणारा बैल आणि न काम करणारा बैल. सांड बैल म्हणजे न काम करणारा. सांडचा अर्थ यांनी जो कोणताही घेतला असेल आणि त्याचा जर विपर्यास केला असेल, तर मला असं वाटतं की आपलं अपयश झाकण्यासाठी कुणावर तरी खापर फोडणं हा काँग्रेसवाल्यांचा जुना धंदा आहे.

दानवेंची राहुल गांधींवर कोणत्या शब्दात टीका?

एखाद्या देवाला आपण गोरं सोडतो ना, त्याला काय म्हणतात आपल्याकडे? असा प्रश्न दानवेंनी विचारला. त्यावेळी सांड असं उत्तर उपस्थितांकडून देण्यात आलं. ते काय करतं त्याला म्होरकी नसती, त्याला वेसण नसती. त्याला ठिकाणाही नसतो कुठं बांधायचं झालं तर. कारण त्याला मालकच नसतो. ते कुणाच्याही शेतात जातं आणि खातं. शेताचा मालकही म्हणतो जाऊद्या खाऊद्या, ते तरी कुठं जाईल खायला. आणि खाऊन मग कसा लठ्ठ्या होतो, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केलीय.

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दानवेंना प्रत्युत्तर

दरम्यान, दानवे यांच्या टीकेनंतर आता महाविकास आघाडीतील नेत्यांकडूनही त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलय. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी खरं म्हणजे जो स्वत: सांड आहे तो दुसऱ्याला सांड म्हणतोय, असा टोला दानवे यांना लगावला आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही दानवेंवर टीका केलीय. अशा प्रकारचं वक्तव्य करायचं आणि त्यातून लोकांचं मनोरंजन करायचं. पण रिकामं पोट मनोरंजन घडवू शकत नाही. आज बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महागाई आहे. या सगळ्या मुद्द्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत, अशी टीका पटोले यांनी केलीय.

इतर बातम्या :

मोठी बातमी ! माजी मंत्री संजय राठोड यांना दिलासा, महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपाप्रकरणी क्लीनचीट

बैलगाडा शर्यतीवरुन राजकारण तापलं, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांची मोठी घोषणा

Raosaheb Danve’s explanation after the criticism on Rahul Gandhi

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.