मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची कन्या पूर्वशी राऊतचा (Purvashi Raut) विवाह सोहळा सोमवारी मुंबईत पार पडला. या लग्न समारंभापूर्वी हळद, मेहंदी आणि संगिताचाही जंगी कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि संजय राऊत यांनी एका बॉलिवूडमधील गाण्यावर जोरदार डान्सही केला. मात्र राऊत आणि सुळे यांचा डान्सचा हा व्हिडीओ (Dance Video) तुफान व्हायरल होत आहे. अशावेळी विरोधी पक्षातील काही नेत्यांकडून सुळे आणि राऊत यांच्यावर या डान्सवरुन जोरदार टीकाही करण्यात येतेय. या टीकेला आता सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
तो एक कौटुंबिक कार्यक्रम होता. बाहेरचं कुणीच नव्हतं. अगदी आम्ही 50 लोकही एकत्र नव्हतं. आमच्या घरातल्या मुलीचं लग्न होतं. आम्ही सदानंद, मिसेस राऊत, मुलं असे सगळे त्या कार्यक्रमात होते. एखाद्या प्रायव्हेट फंक्शनमध्ये आम्ही काय करतो त्यावर पण जर कुणाला टीका करायची असेल तर त्यावर काय बोलणार? अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
लेक पूर्वशीच्या लग्नात शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा भन्नाट डान्स @rautsanjay61 | @supriya_sule | #SanjayRaut | #SupriyaSule | #PurvashiRaut | #Wedding | #Dance | #Sangeet | #Shivsena | #NCP pic.twitter.com/zT4EeZLK4g
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 28, 2021
दरम्यान, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता. लग्नात तुम्ही नृत्य करता. एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत. दुसरीकडे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. गावची गावे अंधारात आहेत. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का? असा खोचक सवाल विखे-पाटील यांनी केला होता.
शिवसेनेची बुलंद तोफ आणि रोखठोक भाष्य करणारे नेते संजय राऊत यांची कन्या पूर्वशीचा विवाह सोहळा सोमवारी अत्यंत थाटात पार पडला. मुंबईत रेनन्सां हॉटेलात ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी राऊत यांची कन्या पूर्वशी यांचा विवाह पार पडला. या लग्नसोहळ्यात पूर्वशी आणि मल्हार यांनी धमाकेदार एंट्री घेतली. एखाद्या राजकुमारीप्रमाणे पूर्वशी हॉलमध्ये येताच वाजंत्र्यांनी तिचं सनईच्या सूरात स्वागत केलं. तर, नवरदेव मल्हार यांनी देखील एका विंटेज गाडीतून मांडवात एंट्री घेतली. या विवाह सोहळ्याला स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते.
इतर बातम्या :