भाजप आमदारांना वेलकम टू मुंबई, विधान परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर मुक्कामी बोलावलं, 19 तारखेला महत्त्वाची बैठक

निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 27 मतांची गरज आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला जिंकण्यासाठी 162 मतांची गरज भासणार आहे. भाजपकडे 106 आमदार असून अपक्षांच्या मदतीनं भाजपचं संख्याबळ 113 पर्यंत जाईल. त्यामुळे भाजपचे चार उमेदवार सहज जिंकून येऊ शकतात. पाच उमेदवार जिंकण्यासाठी 135 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.

भाजप आमदारांना वेलकम टू मुंबई, विधान परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर मुक्कामी बोलावलं, 19 तारखेला महत्त्वाची बैठक
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 9:49 AM

मुंबईः राज्यसभेनंतर आता येत्या 20 जून रोजी विधान परिषद निवडणुकीचा (Vidhan Parishad Election) आखाडा रंगणार आहे. परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असल्यामुळे ही निवडणूकदेखील चुरशीची होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मतांची फोडाफोडी होऊ नये, यासाठी भाजपतर्फे (BJP) महाराष्ट्रातील सर्व आमदारांना 18 जूनपासूनच मुंबईत मुक्कामाला येऊन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 19 जून रोजी भाजपच्या आमदारांची (BJP MLA) मुंबईत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मतदान प्रक्रियेची माहिती सर्व आमदारांना दिली जाईल. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने राज्यभरातील आमदारांचे वेगवेगळे गट तयार केले आहेत. सर्व गटप्रमुखांनी आपापल्या गटातील आमदारांना मुंबईत येण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार 18 जूनपासून भाजप आमदारांना मुंबईत हॉटेलमध्ये मुक्कामाला ठेवलं जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदारांची विशेष काळजी घेण्याची जबाबदारी आशीष शेलार, गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर यांना देण्यात आली आहे.

10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात

विधान परिषदेत निवडणुकीत 10 जागांसाठी एकूण 11 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसने दुसरा उमेदवार मागे न घेतल्यामुळे आता महाविकास आघाडीविरुद्ध भाजपा असा सामाना रंगणार आहे. कोणत्या पक्षाचे किती आणि कोणते उमेदवार उभे आहेत? शिवसेना- सचिन अहिर, आमशा पाडवी राष्ट्रवादी काँग्रेस- एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर काँग्रेस- भाई जगताप, चंद्रकांत हांडोरे भाजप- प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड

कुणाकडे किती संख्याबळ?

विधान परिषदेच्या उमेदवाराला निवडणूक जिंकण्यासाठी 27 मतांची गरज आहे. यासाठी कोणत्या पक्षाकडे किती संख्याबळ आहे हे पाहुयात- शिवसेना- 55 राष्ट्रवादी काँग्रेस- 53 काँग्रेस- 44 भाजप-106

कुणाला किती मतांची आवश्यकता?

निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 27 मतांची गरज आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला जिंकण्यासाठी 162 मतांची गरज भासणार आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादीचे दोन उमेदवार सहज जिंकतील. काँग्रेसचाही एक उमेदवार जिंकेल पण दुसऱ्या उमेदवारासाठी अतिरिक्त 10 मतांची गरज आहे. तर भाजपकडे 106 आमदार असून अपक्षांच्या मदतीनं भाजपचं संख्याबळ 113 पर्यंत जाईल. त्यामुळे भाजपचे चार उमेदवार सहज जिंकून येऊ शकतात. पाच उमेदवार जिंकण्यासाठी 135 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे अतिरिक्त 22 आदारांचं पाठबळ मिळवणं भाजपसाठी आगत्याचं आहे. यासाठीच भाजपने तगडी रणनिती आखल्याची माहिती समोर येत आहे. मतदान प्रक्रियेची संपूर्ण माहिती आमदारांना देण्यात येईल, तसेच फोडाफोडीच्या राजकारणाला बळी पडू नये, अशी तंबीही भाजप नेत्यांकडून दिली जाण्याची शक्यता आहे.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....