शरद पवार आधी यूपीएचे चेअरमन होणार, नंतर पंतप्रधान? कोण काय म्हणतंय?

शरद पवारांनी पंतप्रधानपदाची इच्छा व्यक्त केली नाही. यूपीएचं अध्यक्षपद हा सध्या विषय नाही, असं नवाब मलिक म्हणाले

शरद पवार आधी यूपीएचे चेअरमन होणार, नंतर पंतप्रधान? कोण काय म्हणतंय?
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 3:41 PM

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांशी मोट बांधली जावी, असा आग्रह काँग्रेसने धरला आहे. विशेष म्हणजे शरद पवारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याचीही काँग्रेसची तयारी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याऐवजी यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार स्वीकारणार का, पंतप्रधानपदावर दावेदारी सांगण्याची काँग्रेसची मागणी पवार मान्य करणार का, याकडे सर्वसामान्यांचंही लक्ष लागलं आहे. (Views on Sharad Pawar for PM Candidature)

राष्ट्रवादीच्या नेत्यांना काय वाटतं?

“आजच्या घडीला राष्ट्रीय पातळीवर विरोधकांना एकजूट करणं आवश्यक आहे आणि त्या दिशेने मी काम करत आहे, असं शरद पवार यांनी आधीच सांगितलं होतं. विरोधकांचा नेता कोण होईल, हा प्रश्न नाही, तर आधी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण आहे, जनता कंटाळलेली आहे. मजूर, शेतकरी यांच्यामध्ये सरकारविरोधात रोष आहे, त्यामुळे विरोधक एकजूट झाले आणि मतविभाजन टाळलं तर सत्ता परिवर्तन निश्चित आहे. त्या दिशेने शरद पवारांचं काम सुरु आहे” असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना स्पष्ट केलं.

“शरद पवार यांनी पंतप्रधानपदाची इच्छा व्यक्त केलेली नाही. यूपीएचं अध्यक्षपद किंवा विरोधी पक्षांचा नेता कोण होणार, हा सध्या विषय नाही, त्याबाबत सर्व जण मिळून निर्णय घेतील. विधान परिषदेच्या निकालांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला महाराष्ट्राने स्वीकृती दिली आहे. त्यामुळे देशातही हा प्रयोग झाला, तर स्वीकारलं जाईल. जनतेला चांगला पर्याय दिल्यास सत्तांतर निश्चित आहे” असंही नवाब मलिक म्हणाले.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार काय म्हणतात?

“यूपीएचे अध्यक्ष कोण व्हावं, हा त्यांचा अंतर्गत मामला आहे. त्यावर भाजपला भाष्य करण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश वेगाने प्रगती करत आहे. कोणीही कितीही सत्याची भूमिका घेतली तरी जनता साथ देईल, असं वाटत नाही. जो काम करतो, राष्ट्रहितासाठी सर्वस्व पणाला लावतो, ज्याला परिवाराची चिंता नसते, तो नेता देशाला हवा आहे. कितीही जण एकत्र आले तरी उपयोग नाही. त्यांना इंजिनची क्षमता वाढवावी लागेल. जे पक्ष एकजूट करत आहेत, ते आपापल्या भागात जनतेच्या नजरेतून उतरले आहेत. महाराष्ट्रातही विश्वासघाताची मोट बांधून सरकार स्थापन केलं. धोका निर्माण करणे म्हणजे पराक्रम नाही” अशा शब्दात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं.

राजकीय विश्लेषकांचं मत काय?

“महाराष्ट्रात भाजपची कोंडी केली, तसा प्रयोग देशातही होऊ शकतो. यूपीएचं अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे आहे. पण त्यांचं वय आणि प्रकृती पाहता, आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत ते त्यांना झेपणारं नसेल. राहुल गांधी यांच्याकडे सूत्र देण्याऐवजी क्रमांक दोनवर ठेवणं पसंत केलं जाईल. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, वयाच्या ऐंशीव्या वर्षीही कार्यक्षम आहेत. विरोधातील सर्वच पक्षांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. त्यांची राजकीय परिपक्वता, मास बेस, सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा पाहता शरद पवार हा योग्य पर्याय ठरेल. अमेरिकेच्या अध्यक्षपदी 78 वर्षांचे ज्यो बायडेन असतील, तर शरद पवार केंद्रीय पातळीवर नेतृत्वाची धुरा घेऊ शकतात, असं मत ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी व्यक्त केलं. (Views on Sharad Pawar for PM Candidature)

काय आहे मागणी?

शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रासारखी महाविकास आघाडी केंद्रीय स्तरावर करण्याची मागणी केली जात आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या संबंधीचा प्रस्ताव शरद पवार यांना दिल्याची माहिती आहे. विरोधी पक्षाला एकत्र करुन आगामी लोकसभा निवडणुकीचं नेतृत्व करावं, असा प्रस्ताव काँग्रेसने दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर शरद पवार यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याची तयारीही काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष करत आहेत, अशी माहिती विरोधीपक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली.

शरद पवारच का?

पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांना थेट पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरवण्याऐवजी शरद पवार यांच्यासारखा अनुभवी चेहरा देण्याचा काँग्रेसचा प्लान दिसत आहे. शरद पवार यांच्याकडे असलेले नेतृत्वगुण, दांडगा अनुभव, विरोधी पक्षांची मोट बांधण्याची क्षमता याचा फायदा करुन घेण्याचा काँग्रेसचा इरादा असावा.

संबंधित बातम्या :

शरद पवारांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार व्हावे, काँग्रेसची गळ

पवारांनी जो चमत्कार महाराष्ट्रात केला, तो देश पातळीवर करतील?; समजून घ्या 12 पॉईंटमधून!

(Views on Sharad Pawar for PM Candidature)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.