उद्या कोण-कोण शपथ घेणार? किती वाजता राज्यपालांकडे जाणार? विजय रुपानी यांनी दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra Govt Formation : महाराष्ट्रात भाजपाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून आलेले विजय रुपानी यांनी सत्ता स्थापनेसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. उद्या कोण-कोण शपथ घेणार? सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना किती वाजता भेटणार? ते त्यांनी सांगितलं.

उद्या कोण-कोण शपथ घेणार? किती वाजता राज्यपालांकडे जाणार? विजय रुपानी यांनी दिली महत्त्वाची माहिती
Maharashtra Govt Formation
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 1:47 PM

“आज विधानसभा संसदीय पक्षाचे नेते म्हणून सर्व सहमतीने, एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली” असं भाजप नेते विजय रुपानी यांनी सांगितलं. “संसदीय नेता निवडीची प्रक्रिया उत्साहात, आनंदाच्या वातावरणात संपन्न झाली” असं विजय रुपांनी म्हणाले. ते दिल्लीहून केंद्रीय निरीक्षक म्हणून आले होते. त्यांच्या आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेत्याची निवड करण्यात आली. भाजप महायुतीमधला मोठा पक्ष आहे. मुख्यमंत्री त्यांचाच होणार. भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होणं, म्हणजे ते महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील.

केंद्रीय निरीक्षक म्हणून आलेल्या विजय रुपानी यांना सरकार स्थापनेला विलंब का झाला? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर ते म्हणाले की, “आमचा पक्ष सामूहीक निर्णय घेतो. त्यामुळे कधीकधी विलंब होतो. आमच्याकडे हुकूमशाही नाही. आघाडी म्हणून निवडणूक लढवली. सर्वांशी चर्चा करुन विचार विनिमय करुन निर्णय झाला. म्हणून थोडा विलंब झाला”

सरकार स्थापनेचा दावा कधी?

उद्या कोण शपथ घेणार? मंत्रिमंडळातील सदस्य सुद्धा शपथ घेणार का? यावर सुद्धा विजय रुपानी बोलले. “ते संध्याकाळी हायकमांडशी चर्चा झाल्यानंतर ठरेल. उद्या आझाद मैदानात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री नक्की शपथ घेतील” असं त्यांनी सांगितलं. सरकार स्थापनेचा दावा कधी करणार? यावर आज दुपारी 3 वाजता राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याच त्यांनी सांगितलं.

पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.