अजित पवार म्हणाले होते, बघतोच कसा आमदार होतो ते, विजय शिवतारे प्रचंड पिछाडीवर
लोकसभा निवडणुकीच्या काळात विजय शिवतारे (Ajit Pawar Vijay Shivtare) आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा वाद टोकाला गेला होता.
पुणे : शिवसेनेचे पुरंदरचे उमेदवार आणि राज्यमंत्री विजय शिवतारे (Ajit Pawar Vijay Shivtare) प्रचंड फरकाने पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे संजय जगताप यांनी 15 व्या फेरीअखेर 17645 मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषालाही सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात विजय शिवतारे (Ajit Pawar Vijay Shivtare) आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा वाद टोकाला गेला होता.
विजय शिवतारे यांना या निवडणुकीत आमदार होऊ देणार नाही, अशी घोषणा लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी केली होती. विजय शिवतारेंचा एकेरी उल्लेख करत, बघतोच कसा आमदार होतो ते, असं अजित पवार म्हणाले होते. त्यामुळे या मतदारसंघात अजित पवारांची खेळी यशस्वी झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, अजूनही मतमोजणी सुरु असून अंतिम निकाल आलेला नाही. पण विजय शिवतारे हे मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात शिवतारे यांनी बारामतीत जाऊन पवार कुटुंबावर टीका केली होती. त्यानंतर अजित पवारांनी त्यांचा समाचार घेतला होता.
VIDEO : अजित पवार काय म्हणाले होते?