पार्थच्या जिव्हारी लागलं असेल, पण तो संयमी, सर्वांचा सन्मान करतो, आत्याकडून कौतुक
"पार्थला कुणी राजकीय आमंत्रण देईल, असं मला वाटत नाही. पार्थ तसा वेगळा विचार करणार नाही. मी लहानपणापासून त्याला ओळखते", अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांच्या आत्या विजया पाटील यांनी दिली (Vijaya Patil reaction on Parth Pawar).
कोल्हापूर : “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेली टीका नातू पार्थ पवार यांना जिव्हारी लागली असेल. पण, तो खूप संयमी आणि हुशार मुलगा आहे. तो घरात खूप चांगलं वागतो. सगळ्यांचा सन्मान करतो. त्यामुळे तो खूप मोठा किंवा वेगळा विचार करणार नाही”, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांच्या आत्या विजया पाटील यांनी दिली (Vijaya Patil reaction on Parth Pawar).
शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर प्रसारमाध्यमांसमोर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीतील घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांच्या आत्या विजया पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित केली. यावेळी त्यांनी पवार कुटुंबासंबंधित सुरु असलेल्या विविध घडामोडींवर प्रतिक्रिया दिली (Vijaya Patil reaction on Parth Pawar).
“पार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. शरद पवारांना त्याला सूचना देण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे. राजकीय पातळीवर या विषयावरुन जे सुरु आहे त्यावर मला भाष्य करायचं नाही”, अशी रोखठोक भूमिका विजया पाटील यांनी मांडली.
हेही वाचा : पार्थचा विषय कौटुंबिक, शरद पवार-पार्थ पवार वादावर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया
“पार्थ तरुण मुलगा आहे. त्याला कदाचित वाईट वाटलंही असेल. तो आमच्याशी बोलणार आहे. आम्ही बोलतो ते घरघुती बोलतो, राजकीय सल्ले देत नाही. राजकीय सल्ले द्यायला शरद पवारांसारखे देशपातळीवरच नेते आमच्या घरात आहेत. या गोष्टीचा मला अत्यंत अभिमान आहे”, असं विजया पाटील म्हणाल्या.
“या प्रकरणाचा जेवढा आव आणला जातोय तसं काही घडलेलंच नाही. शरद पवार हे शरद पवार आहेत. त्यांना कोणालाही, काहीही सल्ला देण्याचा अधिकार आहे. त्यांनी त्याला पक्ष पातळीवर सल्ला दिला आहे. आम्ही घरातीलही त्यांचे सल्ले घेतो”, अशी ठाम भूमिका विजया पाटील यांनी मांडली.
“पार्थला कुणी राजकीय आमंत्रण देईल, असं मला वाटत नाही. पार्थ तसा वेगळा विचार करणार नाही. मी लहानपणापासून त्याला ओळखते”, असंदेखील विजया म्हणाल्या.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी पार्थ यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. याबाबत प्रश्न विचारला असता “प्रत्येकाला आपले विचार स्पष्टपणे मांडण्याचा अधिकार आहे”, अशी प्रतिक्रिया विजया पाटील यांनी दिली.
‘आमच्यासाठी रोहित आणि पार्थ दोघे सारखेच’
“आमच्यासाठी रोहित आणि पार्थ दोघे सारखेच आहेत. रोहितही माझ्या हक्काचा आणि भावाचा मुलगा आहे. रोहित त्याचा मोठा भाऊ आहे. दोघांचं अतिशय चांगले संबंध आहेत. त्यांचं एकमेकांशी चांगलं जमतं. रोहितही आमच्याशी बोलत असतो”, असं विजया पाटील यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
Pawar Family | अजित पवार-पार्थ पवार बारामतीला जाणार, श्रीनिवास पवारांच्या घरी कौटुंबिक बैठक
शरद पवार कुटुंबातील प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम, पार्थबाबत मी काय बोलणार? : संजय राऊत