Mumbai Pune Expressway: मेटेंच्या अपघातानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेस वेसाठी 2 महत्वाच्या घोषणा, हद्द आणि लोकेशन प्रश्न कायमचा सुटणार

विनायक मेटेंचं अपघाती निधन झालं. त्यांच्या अपघातानंतर सरकारने मुंबई-पुणए एक्सप्रेसवेवर काही उपाय योजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai Pune Expressway: मेटेंच्या अपघातानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेस वेसाठी 2 महत्वाच्या घोषणा, हद्द आणि लोकेशन प्रश्न कायमचा सुटणार
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 12:03 PM

मुंबई : विनायक मेटेंचं अपघाती निधन झालं. त्यांच्या अपघातानंतर सरकारने मुंबई-पुणए एक्सप्रेसवेवर (Mumbai Pune Expressway) काही उपाय योजना करण्याचा निर्णय घेतला आहे. आता अपघात झाल्यावर आपण अपघात नियंत्रण कक्षाला फोन केला तर आता आपल्या अपघाताचं लोकेशन त्यांना जाणार आहे. जेणे करुन अपघात नेमका कुठे झाला याचे तपशील पोलिसांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे अपघातानंतरची प्राथमिक मदत पोहोचायला मदत होईल. शिवाय हद्दीचा प्रश्नही उपस्थित होऊ नये. यासाठी उपाय करणं गरजेचं आहे. त्यासाठी लाईव्ह लोकोशनही यंत्रणेला मिळायला हवा. जेने करून पुढचा धोका टाळता येऊ शकतो. ट्रक आपली लेन सोडून चालतात. त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. त्यासाठी संपूर्ण मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आयटीएमएस सिस्टीम तयार करणार आहोत. सॅटेलाईट इमेज आणि ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला या मार्गावर लक्ष ठेवता येईल. कुणी लेन सोडून चालत असेल किंवा एखादा अपघात झाला असेल तर त्याची माहिती यंत्रणेला मिळेल. या संदर्भातील माहिती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात दिली.

अजित पवार यांनी एक मुद्दा उपस्थित केला तो एक्सप्रेसवेवरून वेगात जाणाऱ्या ट्रकचा. ट्रकमुळे लहान गाड्यांना चालताना भिती वाटते असं न होता सगळ्यांना सुरक्षित प्रवास करता यावा, असा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला. हद्दीचा प्रश्न उपस्थित होऊ नये. अनेकदा अपघातात हा हद्दीचा प्रश्न निर्माण होतो तसं न होता आधी मदत पोहोचायला हवी, असंही ते म्हणालेत.

112 या क्रमांकावर फोन गेल्यानंतर जिथे अपघात झाला तिथलं लोकेशन गेलं पाहिजे. पत्ता सांगितला जातो. पण त्याचं लोकेशनही अपघात जायला हवं, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांचा अपघात कसा झाला याचा अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. अपघात झाल्यानंतर त्यांच्या ड्रायव्हरने 112 नंबरला फोन केला. त्यांनी सांगितलं की आम्ही टनेलच्या अलिकडे आहोत. मग पोलीस तिथे पोहोचले पण टनेलच्या जवळ त्यांची गाडी नव्हते. पुढे एक-दीड किलोमीटर गेले तरी ती गाडी सापडली नाही. मग रायगड पोलिसांच्या हद्दीत असल्यामुळे रायगड पोलिसांनी तिथं गेले. ड्रायव्हरला व्यवस्थित सांगता आलं नाही. पण ते टनेलच्या खूप पुढे होते. तेवढ्यात ही माहिती आयआरबीला समजली. माहिती मिळताच ते सात मिनिटात तिथे पोहोचले. त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेले पण पोहोचेपर्यंत मेटे यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.