AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आर्यन खाननंतर वेळ मिळाला तर राज्यातील शेतकऱ्यांकडे पाहा’, विनायक मेटेंचा ठाकरे सरकारवर निशाणा

शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. आर्यन खान नंतर वेळ मिळाला तर राज्यातील शेतकऱ्यांकडे पाहा, असा खोचक टोला मेटे यांनी सरकारला लगावलाय.

'आर्यन खाननंतर वेळ मिळाला तर राज्यातील शेतकऱ्यांकडे पाहा', विनायक मेटेंचा ठाकरे सरकारवर निशाणा
विनायक मेटे, उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 9:03 PM

मुंबई : गेल्या 26 दिवसांपासून राज्यात आर्यन खान आणि मुंबई ड्रग्स प्रकरण गाजत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते या प्रकरणावरुन एनसीबी आणि भाजपवर टीका करताना पाहायला मिळाले. या काळात राज्यातील मुलभूत प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष झाल्याचं दिसून आला. या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. आर्यन खान नंतर वेळ मिळाला तर राज्यातील शेतकऱ्यांकडे पाहा, असा खोचक टोला मेटे यांनी सरकारला लगावलाय. (Vinayak Mete criticizes Thackeray government over Aryan Khan case and ignoring farmers’ issue)

‘उद्धवा… अजब तुझे सरकार’ असं म्हणत आमदार विनायक मेटे यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. बीड जिल्ह्यात केवळ दहा महिन्यातच 159 आत्महत्या झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनासाठी आणि सरकारसाठी ही लाजिरवाणी बाब आहे. प्रशासनाने किती आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन चौकशी केली? असा सवाल मेटे यांनी केलाय. तर दिवाळीनंतर शिवसंग्राम रस्त्यावर उतरणार असून हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशाराही मेटे यांनी यावेळी दिला.

उद्या पुण्यात शिवसंग्रामचा पदाधिकारी मेळावा

कोरोना नियम शिथिल होताच राज्यात वेगवेगळ्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. सहकारी संस्था, जिल्हा बँका, पोटनिवडणुका अशा अनेक प्रकारच्या निवडणुका राज्यात होत आहेत. तर आगामी काळात राज्यातील प्रमुख शहरांच्या पालिका निवडणुकादेखील येऊ घातल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त चर्चा ही पुणे महानगरपालिकेची रंगलीय. पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 च्या फेब्रुवारी महिन्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष आपापल्या परीने योजना आखत आहे. याच पार्श्वभूमीवर विनायक मेटेंचा शिवसंग्राम ही निवडणूक ताकदीने लढवणार आहे. उद्या पुण्यात शिवसंग्रामचा पदाधिकारी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात विनायक मेटे आपली भूमिका आणि निर्णय जाहीर करणार आहेत.

मेळाव्यात शिवसंग्रामची भूमिका ठरणार

तसेच ही निवडणूक स्वतंत्र्यरित्या लढवावी की भाजपशी हातमिळवणी करावी यावरुसुद्धा उद्या म्हणजेच रविवारी 31 ऑक्टोबर रोजी निर्णय घेतला जाणार आहे. मेटे यांनी पालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता पुण्यात राजकीय गणितं बदलण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी शिवसंग्रामच्या उद्या होणाऱ्या मेळाव्यात आता काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुणे महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल

  • भाजप 99
  • काँग्रेस 09
  • राष्ट्रवादी 44
  • मनसे 2
  • सेना 9
  • एमआयएम 1
  • एकूण 164

इतर बातम्या :

समीर वानखेडेकडून प्रायव्हेट आर्मी चालवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, नवाब मलिकांचा आरोप

आर. आर. पाटलांच्या पावलावर पाऊल! नक्षलवाद्यांच्या धमक्या झुगारून एकनाथ शिंदे गडचिरोलीत, पोलिस जवानांसोबत दिवाळी साजरी

Vinayak Mete criticizes Thackeray government over Aryan Khan case and ignoring farmers’ issue

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.