बीड: “बीडमध्ये कितीही हजार पोलिसांचा बंदोबस्त असला, तरी मोर्चा निघणार,” असा निर्धार शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केल्यानंतर बीडमध्ये राज्यातील पहिला मराठा मोर्चा (Maratha Morcha) निघणार आहे. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. (Maratha Kranti Morcha in beed police deployed)
विनायक मेटे यांनी नुकतंच नारायणगडाचं दर्शन घेतलं आहे. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारला सद्बुद्धी देण्याचं साकडं घातलं आहे. बीडमध्ये मराठा मोर्चा निघणार आहे. कितीही हजार पोलिसांचा बंदोबस्त असला तरी मोर्चा हा निघणार आहे. तसेच हा मोर्चा यशस्वी करु. सध्या बीडमध्ये कार्यकर्ते यायला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी पोलिसांचं काम करावं, मात्र कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याचीही दक्षता घ्यावी, असा इशारा विनायक मेटेंनी दिला आहे.
बीडमध्ये निघणाऱ्या या मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मराठा क्रांती संघर्ष मोर्चासाठी पोलिसांचा कड़ेकोट बंदोबस्त असणार आहे. मराठा क्रांती संघर्ष मोर्चासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच बीडमध्ये एसरपीएफच्या एका तुकडीसह 531 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. तसेच मुंबईतील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर शेकडो पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. बीडमधील छत्रपती शिवाजी स्टेडियमवरून मराठा क्रांती संघर्ष मोर्चा निघणार आहे.
मराठा क्रांती संघर्ष मोर्चासाठी 3 डीवायएसपी, 11 पीआय, 28 पीएसआय, 96 महिला पोलिसांसह 306 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय एसरपीएफच्या तुकडीसह जवळपास 600 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. मराठा क्रांती संघर्ष मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र तरीही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच एसरपीएफची एक तुकडीही बीड शहरात तैनात करण्यात आली आहे.
एकीकडे संभाजीराजे छत्रपती यांनी कोरोनाच्या काळात मोर्चे काढू नका, अशी भूमिका घेतली असताना विनायक मेटे मोर्चा काढण्यावर ठाम होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन मोर्चाला परवानगी मिळावी म्हणून निवेदन सादर केले होते. सदरचा मोर्चा मराठा क्रांती मोर्चांच्या प्रथेप्रमाणे शांततेत व शिस्तीत, कायदा व सुव्यवस्थेला कुठलीही बाधा येऊ न देता काढला जाईल. त्याचप्रमाणे करोना महामारीच्या काळातील आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करून, सोशल डिस्टनसिंग पाळून हा मोर्चा काढला जाईल याची खात्री असावी, असे या निवेदनात म्हटले होते. मात्र, त्यानंतरही पोलिसांकडून या मोर्चाला परवानगी नाकरण्यात आली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मोर्चे काढण्याला संभाजीराजे छत्रपती यांचा विरोध आहे. आंदोलन काय असतं, हे कोणीही मला शिकवू नये. आक्रमक व्हायला दोन मिनिटं लागतात. आंदोलनाला काय लागतं, आता लगेच करु. पण त्यामध्ये कोणी मयत झाले तर त्याला जबाबदार कोण, शाहुंचा वंशज, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला होता.
जेव्हा एखादी गोष्ट राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवायची असते, तेव्हा मोर्चे काढले जातात. मराठा समाजाने 58 मोर्चे काढून आपलं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवलं आहे. मराठा समाजाला काय हवंय, हे राज्यकर्त्यांना माहिती आहे. मग परत एकदा मोर्चे काढून लोकांना वेठीस का धरायचे, असा सवाल संभाजीराजे यांनी इतर मराठा नेत्यांना विचारला होता.
रस्त्यावर उतरून कोरोनामुळे लोक मेले तर काय करायचं? राज्य सरकारने दखल घेतली नाही तर आंदोलन करावेच लागेल. मात्र, सर्वप्रथम राज्यकर्ते मराठा समाजासाठी कोणत्या गोष्टी करायला तयार आहेत, हे त्यांनी सांगावे. श्रीमंत मराठ्यांना एक टक्काही आरक्षण देऊ नका. पण 30 टक्के गरीब मराठा समाजाला मदत मिळालीच पाहिजे, असे संभाजीराजे यांनी सांगितले. (Maratha Kranti Morcha in beed police deployed)
संबंधित बातम्या :
Maratha Morcha: बीडमध्ये मराठा समाजाचा एल्गार; परवानगी नाकारुनही मोर्चाची जय्यत तयारी
‘श्रीमंत मराठ्यांना एक टक्काही आरक्षण नको, पण बहुजनांना जो न्याय, तोच गरीब मराठ्यांनाही द्या’