मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव, ‘हे’ मंत्री आमचा पक्ष फोडतायत, गंभीर इशारा कुणाचा?

बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा मंत्री शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न करत असेल तर ते मित्रधर्म पाळत नाहीत, असाच अर्थ निघतो असा सूचक इशारा तानाजी शिंदे यांनी दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव,  'हे' मंत्री आमचा पक्ष फोडतायत, गंभीर इशारा कुणाचा?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 9:00 AM

सोलापूरः आमच्या पक्षाच्या अध्यक्षाचं अपघाती निधन झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारमधील मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे शिवसंग्राम पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शिवसंग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे (Tanaji Shinde) यांनी हा आरोप केलाय. विनायक मेटे यांच्या निधनानंतर पक्षावर संकट आलं असताना शिंदे गटाकडून हा पक्ष फुटल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. तसेच यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव वापरलं जातंय, त्यामुळे शिंदे यांनी याची दखल घ्यावी, असा इशारा तानाजी शिंदे यांनी दिला आहे.

तानाजी शिंदे यांनी काल सोलापूरमध्ये हा इशारा दिला. शिवसंग्राम संघटनेने यासाठी मंत्री उदय सामंत यांना जबाबदार धरलंय. ते म्हणाले, उदय सामंत यांनी शिवसंग्रामचे पदाधिकारी शिंदे गटात येत असल्याची खोटी माहिती माध्यमांना दिली. सामंत यांची ही भूमिका न पटणारी आहे…

उदय सामंत यांनी उल्लेख केलेल्या कार्यक्रमात शिवसंग्रामचा केवळ एकच पदाधिकारी होता. बाकी कुणीही नव्हतं. पण याची कोणतीही खातरजमा न करता शिवसंग्रामचे पदाधिकारी असल्याचं सामंत यांनी म्हटल्याचा आरोप तानाजी शिंदे यांनी केला.

2014 पासून शिवसंग्राम ही संघटना भाजपासोबत घटकपक्ष म्हणून काम करते. मात्र काही महिन्यांपूर्वी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं. यामुळे पक्ष दुःखात असताना शिंदे गटातर्फे असे प्रयत्न होणं खेदजनक आहे…

पाहा तानाजी शिंदे यांचा इशारा-

बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा मंत्री शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न करत असेल तर ते मित्रधर्म पाळत नाहीत, असाच अर्थ निघतो असा सूचक इशारा तानाजी शिंदे यांनी दिला.

उदय सामंत यांनी सांगितलेल्या महिला अध्यक्ष, युवक अध्यक्ष किंवा सोशल मीडिया प्रमुख यापैकी कुणीही त्यांच्यासोबत नव्हते. तरीही उदय सामंत यांनी त्यांचा राज्याला अशा प्रकारे परिचय करून दिला. या घटनेनंतर संपूर्ण मराठा समाजात शिंदे गटाबाबत तीव्र भावना उमटल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री शिंदे यांना देण्यात आला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.