केंद्रीय पथकाचा पाहणी दौरा म्हणजे बैल गेला नि झोपा केला, विनायक राऊतांचा घणाघात

त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचाही ते दौरा करणार आहेत. त्याच दौऱ्यावरून आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर निशाणा साधलाय. vinayak raut modi government

केंद्रीय पथकाचा पाहणी दौरा म्हणजे बैल गेला नि झोपा केला, विनायक राऊतांचा घणाघात
सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एनएमसीची मान्यता
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 3:19 PM

– विनायक वंजारे, टीव्ही 9 मराठी, सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग: तोक्ते चक्रीवादळात कोकणातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यासाठी केंद्रीय पथकही राज्यात दाखल झालं असून, पालघर जिल्ह्यातून पाहणी केल्यानंतर आता ते पथक रायगडमध्ये पोहोचलंय. त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचाही ते दौरा करणार आहेत. त्याच दौऱ्यावरून आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर निशाणा साधलाय. (Vinayak Raut Criticism On Modi Government Central Squad Inspection Tour)

केंद्रीय पथकाचा पाहणी दौरा म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत सिंधुदुर्गात पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय पथकाचा पाहणी दौरा म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार असल्याची खरमरीत टीकाही त्यांनी केलीय. तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कोकण किनारपट्टीच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दाखल झालेल्या केंद्रीय पथक दौऱ्यावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय.

‘सवतीचं पोर’ या भावनेतून केंद्र सरकार महाराष्ट्राकडे पाहतंय

‘सवतीचं पोर’ या भावनेतून केंद्र सरकार महाराष्ट्राकडे पाहत असल्याचा घणाघातही त्यांनी केलाय. केंद्र सरकार महाराष्ट्राकडे अत्यंत कलूषित नजरेने पाहात असून, निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेलासुद्धा केंद्रीय पथक उशिरा आलं आणि आताही हे पथक उशिराने येत आहे, या पथकाला झालेलं नुकसान तेव्हाही दिसलं नाही आणि आताही दिसणार नाही. बैल गेला आणि झोपा केल्यासारखाच हा पाहणी दौरा असल्याची जहरी टीका विनायक राऊत यांनी केलीय.

देवेंद्र फडणवीसही सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राज्याला तौक्ते चक्रीवादळाचा बसलेला फटका आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका या पार्श्वभूमीवर फडणवीस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने ते शेतकऱ्यांशी विचारपूस करून नुकसानीचा आढावा घेत आहेत. तसेच रुग्णालयांना भेटी देऊन आरोग्य व्यवस्थेची माहितीही घेत आहेत.

संबंधित बातम्या:

एक दिवस देवेंद्र फडणवीस मातोश्रीवरही येतील: संजय राऊत

संजय राऊतांची अवस्था ना घरका ना घाटका; देवेंद्र फडणवीसांची टीका

Vinayak Raut Criticism On Modi Government Central Squad Inspection Tour

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.