तुमची बडबड बंद व्हावी म्हणून विदर्भातील मतदारांचा महाविकास आघाडीला कौल; राऊतांची फडणवीसांवर टीका

फडणवीस यांनी बडबड बंद करावी. सरकारवर आमचा विश्वास आहे. हा सल्ला विदर्भातील जनतेने दिला आहे, असे विनायक राऊत म्हणाले. (Vinayak Raut Devendra Fadnavis)

तुमची बडबड बंद व्हावी म्हणून विदर्भातील मतदारांचा महाविकास आघाडीला कौल; राऊतांची फडणवीसांवर टीका
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 5:21 PM

उस्मानाबाद : “भारतीय जनता पक्षाला मतदारांनी 100 टक्के धुडकावून लावले आहे. विदर्भ, नागपूरमध्ये भाजपचा पराभव झाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बडबड बंद करावी; महविकास आघाडी सरकारवर आमचा विश्वास आहे. हा सल्ला विदर्भातील जनतेने दिला आहे,” अशी खोचक टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. जिल्ह्यातील तुळजापूर येथील मुद्गलेश्वर मंदिरात मीनाताई ठाकरे यांच्या स्मरणार्थ विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. (Vinayak Raut criticizes Devendra Fadnavis on defeat in Nagpur)

विधानपरिषदेच्या नागपूर मतदारसंघात (Nagpur Graduate Constituency Election) भाजपची पिछेहाट झाली. मागील 55 वर्षांपासून या जागेवर भाजपचे प्राबल्य होते. यावेळी मात्र, ही जागा महाविकास आघाडीने खिशात घातली. या ठिकाणी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी (Abhijit Vanjari) यांनी विजय मिळवला. तर भाजपचे उमेदावार संदीप जोशी (Sandeep Joshi) यांना पराभव पत्करावा लागला. यावर विनायक राऊत यांनी भाष्य केले.

तसेच, अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर आहेत. या मतदारसंघात भाजप आणि महाविकास आघाडीचे उमेदवार पिछाडीवर आहेत. या दोन्ही मतदारसंघातील जय पराजयाविषयी विनायक राऊत यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजपवर टीकेचे आसूड ओढले.

फडणवीसांनी बडबड बंद करावी

“भारतीय जनतेला मतदारांनी 100 टक्के धुडकावून लावले आहे. विदर्भ, नागपूरमध्ये भाजपचा पराभव झाला. देवेंद्र फडणवीस यांनी बडबड बंद करावी; महाविकास आघाडीवर आमचा विश्वास आहे, असा संदेश विदर्भातील जनतेने दिला,” अशी खोचक टीका राऊत यांनी केली. तसेच भाजपने विरोधी पक्षात काम करायचे आहे, हा संदेश महाराष्ट्रातील जनतेने दिला. या संदेशाचे भाजपने तंतोतंत पालन करावे,” असा सल्लाही यावेळी खासदार राऊत यांनी भाजपला दिला.

अमरावतीत भाजपचा उमेदवार सहाव्या क्रमांकावर

यावेळी बोलताना त्यांनी अमरावती शिक्षक मतदारसंघातील होत असलेल्या पराभवावरही प्रतिक्रिया दिली. “या मतदारसंघात पैशांचे वाटप झाले. याबाबत तक्रारसुद्धा दाखल करण्यात आली. देवेंद्र फडणवीस शिवसेनेला हिणवत आहेत. पण ते त्यांच्या घरतला उमेदवार वाचवू शकले नाहीत. अमरवतीत भाजपचा उमेदवार सहाव्या क्रमांकावर फेकला गेला,” अशी टीका राऊत यांनी केली.

संबंधित बातम्या :

भाजप बेसावध, ससा-कासवाच्या गोष्टीप्रमाणे पदवीधरमध्ये जिंकून येण्याचा आभास : मुनगंटीवार

पुणे आणि नागपूर पदवीधरमध्ये भाजपला मोठा धक्का!, हिंमत असेल तर एकटे लढा, चंद्रकांत पाटलांचं सत्ताधाऱ्यांना आव्हान

Graduate Constituency Elections LIVE | पदवीधर आणि शिक्षक निवडणूक, कुठे-किती टक्के मतदान?

(Vinayak Raut criticizes Devendra Fadnavis on defeat in Nagpur)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.