AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटात सर्वजण स्वार्थासाठी गेले म्हणून आज ही वेळ; बच्चू कडू, रवी राणा वादावरून ठाकरे गटाचा निशाणा

आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. यावरून विरोधकांनी शिंदे गटावर टीकेची झोड उडवली आहे.

शिंदे गटात सर्वजण स्वार्थासाठी गेले म्हणून आज ही वेळ; बच्चू कडू, रवी राणा वादावरून ठाकरे गटाचा निशाणा
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 9:47 AM

मुंबई : आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. रवी राणा यांच्या खोके घेतल्याच्या आरोपाला बच्चू कडू यांनी देखील सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. रवी राणा यांनी पुरावे द्यावेत अन्यथा एक तारखेला सात ते आठ आमदार घेऊन वेगळा निर्णय घेऊ असा थेट इशाराच आता बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला आहे. आता बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या या वादावर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून (NCP) टीकेची झोड उडवण्यात येत आहे. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हटलं विनायक राऊत यांनी?

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादावरून आता राजकारण चांगलचं तापलं आहे. यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. आज बच्चू कडू आणि रवी राणा हे भांडत आहेत. तर उद्या भाजप आणि शिंदे गट एकमेकांच्या उरावर बसतील असा घणाघात विनायक राऊत यांनी केला आहे. शिंदे गटात सर्वच स्वार्थासाठी गेले होते. मात्र आता त्यांचा तिथे अपेक्षाभंग झाल्याचंही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीचा निशाणा

दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादीने देखील या वादात उडी घेतली आहे.  बच्चू कडू यांच्याकडून राज्य सरकारला इशारा देण्यात आला आहे. रवी राणा यांनी पुरावे न दिल्यास एक तारखेला आम्ही सात ते आठ आमदार वेगळा निर्णय घेऊ असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. यावरून राष्ट्रवादीने भाजपावर निशाणा साधला आहे. बच्चू कडू यांच्या मागे दहा ते बारा आमदार उभे करणारे फडणवीस हेच आहेत असा दावा राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर..
पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर...
भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक
भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक.
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला.
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं.
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार.
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी.
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप.
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?.
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान.
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.