आरक्षण तर भाजपच देईल म्हणणाऱ्या दानवेंचं तोंड बंद का होतं?; विनायक राऊत बरसले
मराठा आणि धनगर समाजाला भाजपच आरक्षण देईल असं भाजप नेते रावसाहेब दानवे वारंवार सांगत असतात. पण जेव्हा 50 टक्के आरक्षणाची मर्यादा उठवून राज्यांना आरक्षण देण्याच्या सूचनेवर संसदेत मतदान घेण्यात आलं. (vinayak raut)
नवी दिल्ली: मराठा आणि धनगर समाजाला भाजपच आरक्षण देईल असं भाजप नेते रावसाहेब दानवे वारंवार सांगत असतात. पण जेव्हा 50 टक्के आरक्षणाची मर्यादा उठवून राज्यांना आरक्षण देण्याच्या सूचनेवर संसदेत मतदान घेण्यात आलं, तेव्हा रावसाहेब दानवेंचं तोंड बंद का होतं?, असा सवाल शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केला आहे. (vinayak raut slams raosaheb danve over 127th Constitution Amendment Bill)
विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट रावसाहेब दानवे यांचं नाव घेऊन त्यांच्याावर निशाणा साधला. केंद्र सरकारने आणलेलं 102वं घटना दुरुस्ती हे विधेयक अपुरं असल्याने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल करून त्याचे अधिकार राज्यांना द्यावेत, अशी सूचना आम्ही केली होती. आम्ही जी दुरुस्ती सूचवली होती. ती संसदेत मताला टाकली असता काँग्रेससह इतर पक्षांनी तिला पाठिंबा दिला. एकूण 71 खासदारांनी त्याला पाठिंबा दिला. पण भाजपने विरोध केला. रावसाहेब दानवे काल तिथे होते. कोणत्याही परिस्थिीत भाजपच मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देईल असं सांगणारे दानवे तोंड गप्प करून बसले होते, अशी टीका राऊत यांनी केली.
फडणवीस कोणत्या तोंडाने बोलणार?
राज्यांना आरक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून दिलेल्या सूचनेवर काल संसदेत मतदान झालं. त्याला काँग्रेसने पाठिंबा दिला. पण भाजपने पाठिंबा दिला नाही. आता फडणवीसांनी सांगावं तुम्ही कोणत्या तोंडाने आरक्षणावर बोलणार आहात? कोणत्या आधारावर बोलणार आहात? भाजपचा खोटा मुखवटा काल संसदेत फाडला गेला आहे. मराठा आणि धनगर समाजाने भाजपच्या मुखवट्यापासून सावध राहावे, असं आवाहन त्यांनी केलं.
भाजपचं प्रेम पुतणा मावशीचं
मागच्या काही वर्षापासून मराठा आणि धनगरांच्या आरक्षणावरून ज्यांना कळवळा आला होता. त्या भाजपचं बिंग काल संसदेत फुटलं. भाजपचं मराठा आणि धनगर समाजावरील प्रेम पुतणा मावशीचं होतं. ते दिखाऊपण होतं हे सिद्ध झालं. कालच्या दुरुस्तीला समर्थन न करून मराठा आणि धनगर समाजाचा भाजपने विश्वासघात केला. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी आणि खासदारांनी हा विश्वासघात केला आहे. भाजप हा मराठा आणि धनगरांच्या आरक्षणाबाबत जे बोलत होता. त्या उलट त्यांनी कृत्य केलं आहे. त्यामुळे त्यांना या आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला. (vinayak raut slams raosaheb danve over 127th Constitution Amendment Bill)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 10 August 2021https://t.co/jE9FwqCuvt#sanjayraut | #BJP | #shivsena
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 10, 2021
संबंधित बातम्या:
हा तर भिजलेला फटका, तुम्ही खेळ का करताय? थेट 50 टक्क्यांची मर्यादा उठवा, राऊतांचा हल्लाबोल सुरूच
दारुच्या त्या बाटल्या आमच्या काळातील नसाव्यात, भाजपने लॅबमध्ये पाठवाव्यात; राऊतांचा टोला
(vinayak raut slams raosaheb danve over 127th Constitution Amendment Bill)