राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, दोन पोलीस अॅडमिट
कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला. या अपघातात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

सांगली : कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला. या अपघातात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. मात्र कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम सुखरूप आहेत. विश्वजीत कदम हे सांगली (Sangli flood) जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील नागठाणे अंकलखोप इथे पाहणीसाठी जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. अपघातात दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विश्वजीत कदम हे आपल्या मतदारसंघातील अंकलखोप येथे पूर परिस्थितीची पाहणी करत होते. त्यावेळी अचानक गावातील एक इसम त्यांच्या ताफ्याच्या आडवा आला. त्याला वाचविण्यासाठी ताफ्यातील एका गाडीचा ताबा सुटला. ती गाडी रस्त्याच्या पलीकडे जाऊन गाडीचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, गाडी थेट रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली.
मंत्री विश्वजीत कदम सुखरुप

विश्वजीत कदम
या अपघातात ड्रायव्हर आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यास सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान विश्वजीत कदम हे सुखरूप आहेत.
विश्वजीत कदम यांचे दौरे
दरम्यान, विश्वजीत कदम हे सांगलीतील पूरग्रस्त भागांचे दौरे करत आहेत. नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांनी सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला होता. आज अजित पवारांसह ते मुंबईत मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. या भागातील पूरस्थितीची माहिती ते मुख्यमंत्र्यांना देतील.
सांगली कोल्हापूरची पूरस्थिती आटोक्यात येतीय. आता धोका कमी होतोय. परिस्थिती आटोक्यात येतीय. लोकांना खूप चांगल्या प्रकारे रेस्क्यू करण्यात यश आलं. कोकणवासियांना मोठा फटका बसला. कोकणी बांधवांना आधार देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असं विश्वजीत कदम यांनी दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं.
संबंधित बातम्या