Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“तपास यंत्रणांचा गैरवापर, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न”, विश्वजित कदमांकडून लोकशाहीच्या धोक्याची चिंता व्यक्त

Vishwajeet Kadam : संजय राऊत ईडी प्रकरणावर माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

तपास यंत्रणांचा गैरवापर, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, विश्वजित कदमांकडून लोकशाहीच्या धोक्याची चिंता व्यक्त
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 12:08 PM

सांगली : संजय राऊतांना (Sanjay Raut Ed Inquiry) अटक करण्यात आली आहे. भाजप तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत आहे. त्यामागे कारण आहे, मागच्या काही दिवसात ईडीकडून होणाऱ्या कारवाया. विरोधकांच्याच घरी ईडीची धाड कशी काय पडते. भाजपच्या एकाही नेत्याची चौकशी ईडीकडून कशी काय होत नाही, असा सवाल विरोधीपक्ष विचारत आहेत. अश्यात माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “देशात लोकशाही राहिले की नाही असा प्रश्न देशातील सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झाला आहे. ज्या हुकूमशाही पद्धतीने आज केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून राजकीय द्वेष डोळ्यासमोर ठेऊन विरोधी पक्षाचा आवाज दाबला जातोय, हे आपल्या लोकशाहीप्रधान देशासाठी घातक आहे”, अशी टीका माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी केंद्र सरकारवर केली आहे. विश्वजित कदम हे सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

“देशामध्ये आता लोकशाही राहिले की नाही हा प्रश्न देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना आता निर्माण झालेला आहे ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने आज केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करून राजकीय द्वेष डोळ्यासमोर ठेवून आज विरोधी पक्षांचा आवाज हा दाबला जातोय विरोधी पक्षातल्या नेत्यांना टार्गेट केलं जातं त्यांचा छळवात चाललाय हे निश्चितपणे देशाच्या लोकशाहीला घातक आहे आणि एखाद्याची चौकशी करायची असेल तर निश्चितपणे न्याय प्रक्रियेत योग्य पद्धतीने व्हावे पण जेव्हा एखादा आवाज उठवला जातो तो सर्वसामान्य लोकांसाठी जातो सरकारकडून काही चुकीचं घडत असेल त्याच्या विरोधात उठवला जातो की लगेच मग केंद्रीय यंत्रणा कडुन आज त्याला या ठिकाणी त्रास दिला जातो”, असंही कदम यांनी म्हटलंय.

नजीकचा इतिहास आपल्याला आठवत असेल की तमिळनाडूमध्ये सुद्धा अशाच प्रकारे विधानसभेच्या निवडणुका होत असताना देवांचे मुख्यमंत्री त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना टार् गेट केलं बेंगॉलमध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुका होत असताना तिथल्या अनेक नेत्यांना या ठिकाणी अशाच प्रकारे टार्गेट करण्यात आलं आज आदरणीय श्रीमती सोन्याची गांधी असतील आदरणीय राहुलजी गांधी असतील त्यांनाही टार्गेट केलं जातं म्हणजे हळूहळू एक वेगळ्या पद्धतीचे हुकूमशाही या देशांमध्ये अन्नाचा प्रयत्न आज सत्तेत बसलेले हे सरकार करत आहे हे दुर्दैवी बाब असल्याचं विश्वजीत कदम म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

“त्यांना इतिहास माहित नाही ज्यांनी ज्यांनी जुलमी कारभार या देशावर केला त्याच्या विरोधात मोठी लाट या ठिकाणी आणि स्वातंत्र सैनिकांची लाट उभी राहिली आणि त्या जुनूनला नष्ट करण्याचं काम या देशातल्या स्वातंत्र्यसैनिकांनी थोर पुरुषांनी वीर पुरुषांनी केलेले आहेत पण त्याची पुनरावृत्ती निश्चितपणे होईल”, असा इशाराही त्यांनी दिलाय.

राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं...
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं....
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट.
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?.
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?.
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या...
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या....
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली.
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.