Kirit Somaiya : माहीममध्ये महेश सावंत यांच्या विजयात मुस्लिम मतं निर्णायक, सोमय्या यांनी आकडेच दिले
Kirit Somaiya : उद्धव ठाकरे गटाला थोडाफार आधार मुंबईने दिला. मुंबईतून उद्धव ठाकरे गटाचे 10 आमदार निवडून आले. आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्होट जिहादमुळे उद्धव ठाकरे गटाला फायदा झाल्याचा दावा केला आहे. मौलाना सज्जाद नोमानी यांच्यामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा झाला असं किरीट सोमय्या म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाचे आकडे उद्धव ठाकरे यांच्यासाठी निराशाजनक आहेत. महाविकास आघाडीचा भाग असलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या फक्त 20 जागा निवडून आल्या. मविआमध्ये सर्वात जास्त जागा त्यांनीच जिंकल्या आहेत. पण या निवडणुकीत खरी शिवसेना कोणाची? या प्रश्नाच सुद्धा उत्तर मिळालं आहे. मतदारराजाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भरभरुन मतदान केलं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 17 उमेदवार जिंकले. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फुट पडली. त्यावेळी एकनाथ शिंदेंसोबत गेलेले बहुतांश आमदार निवडून आले. उलट आता जास्त आमदार निवडून आले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली शिवसेना खरी शिवसेना असल्याचा संदेश गेला आहे. याउलट उद्धव ठाकरे यांच्यासमोरील आव्हान अधिक बिकट बनलं आहे.
उद्धव ठाकरे गटाला थोडाफार आधार मुंबईने दिला. मुंबईतून उद्धव ठाकरे गटाचे 10 आमदार निवडून आले. आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्होट जिहादमुळे उद्धव ठाकरे गटाला फायदा झाल्याचा दावा केला आहे. मौलाना सज्जाद नोमानी यांच्यामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा झाला असं किरीट सोमय्या म्हणाले.
माहीमच्या नया नगरमध्ये किती मतं?
मुंबईत 36 पैकी उद्धव ठाकरे सेनेला विधानसभेच्या 10 जागा मिळाल्या, या जागांच्या विजयाचं महत्वाच कारण व्होट जिहाद दिसत आहे असं किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे. त्यांनी ठाकरे सेनेचे माहीममधले उमेदवार महेश सावंत यांना मिळालेल्या मतांच उद्हारण दिलं. महेश सावंत 1316 मतांनी जिंकले. माहीमच्या कापड बाजार, नया नगर या मुस्लीम वस्त्याध्ये उद्धव ठाकरे सेनेच्या महेश सावंत मांना 4540 मते तर शिवेसेनेच्या सदा सरवणकर यांना फक्त 459 मते मिळाली. वर्सोवा विधान सभेच्या मुस्लिमांनी एकतर्फी उद्धव ठाकरे सेनेला मत दिली असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. माहीममध्ये महेश सावंत यांना 50213 मतं मिळाली. त्याखालोखाल सदा सरवणकर यांना 48897 आणि मनसे उमेदवार अमित ठाकरे यांना एकूण 33062 मतं मिळाली.